देवळाली प्रवरा नगरपरिषदेचा शिलकीसह ७६ कोटींचा अर्थ संकल्प सादर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा नगरपरिषदेचा शिलकीसह ७६ कोटींचा अर्थ संकल्प सादर

देवळाली प्रवरा(प्रतिनिधी)  देवळाली प्रवरा नगरपालिकेच्‍या या आर्थिक वर्षातील २ लाख, ०५ पाच हजार,१९८  रुपयाचे शिलकीसह ७६ कोटी ०९ लाख, ६७ हजार ...

देवळाली प्रवरा(प्रतिनिधी)

 देवळाली प्रवरा नगरपालिकेच्‍या या आर्थिक वर्षातील २ लाख, ०५ पाच हजार,१९८  रुपयाचे शिलकीसह ७६ कोटी ०९ लाख, ६७ हजार १९८ रुपयांचा सन २०२१-२०२२ साठी अंदाजपत्रक सर्वानुमते मंजुर करण्‍यात आले. या वर्षीच्‍या अंदाजपत्रकात नगरपरिषदेची घरपट्टी व पाणीपट्टी मध्ये कोणतीही करवाढ न करता शहरातील नागरीकांना दिलासा दिला आहे. नागरीकांच्‍या सोयीसाठी,  विकास कामासाठी , घरकुल योजनांसाठी भरीव तरतुद करण्‍यात आली. शहरातील सर्व गटारी भुमिगत गटारी करण्‍यासाठी नियोजन तयार केलेले असून या पुढील काळात देवळाली प्रवरा शहरात उघडयावरील गटार दिसणार नसल्‍याचे लोकनियुक्‍त नगराध्‍यक्ष सत्‍यजित कदम पाटील यांनी सांगितले.

    देवळाली प्रवरा नगरपालिका सभागृहात नगराध्‍यक्ष सत्‍यजित कदम पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली देवळाली प्रवरा नगरपालिकेची विशेष सभा झाली. या सभेत मुख्‍याधिकारी श्री. अजित निकत यांनी सभागृहापुढे अंदाजपत्रकाचे वाचन केले. आरंभी शिल्‍लक रु.३,३९,१९८ रुपये तर सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात अंदाजीत जमा होणारी ७६ कोटी ०९ लाख ६७ हजार १९८ रुपये असे जमा होणे गृहीत धरण्‍यात आली आहे. २ लाख ५ हजार १९८ रुपये शिलकी राहुन अंदाजपत्रकास नगराध्‍यक्षासह सर्व नगरसेवकांनी मंजुरी दिली आहे्यबाबत नगराध्‍यक्ष कदम पाटील यांनी माहिती देतांना सांगितले की, या वर्षीच्‍या अर्थसंकल्‍पात नगरपालिकेने कोणत्‍याही प्रकारे करवाढ न करता नागरीकांचा हिताचा विचार केला आहे. नागरीकांवर करांचा बोजा पडू नये म्‍हणून या वर्षी मात्र प्रशासनाने करवाढ सुचविलेली असतांनाही कोणतीही करवाढ करण्‍यात आलेली नाही. त्‍यामुळे शहरातील नागरीक निश्चित समाधान व्‍यक्‍त करतील असे कदम पाटील यांनी सांगितले.

   नगरपालिकेने सन २०२१-२०२२ च्‍या अंदाजपत्रकात खालील प्रमाणे खर्च धरण्‍यात आला आहे.  आस्‍थापना खर्च ७ कोटी ४ लाख ७५ हजार रुपये, प्रशासकीय खर्च १ कोटी ३९ लाख ३७ हजार रुपये, व्‍याज व वित्‍त आकार १ कोटी ५ लाख  १५ हजार रुपये, मालमत्‍ता दुरुस्‍ती व परिक्षण ८६ लाख ३१ हजार रुपये, व्‍यवहार व अंमलबजावणीसाठी ९० लाख २२ हजार रुपये, दिलेली महसुली अनुदाने, अशंदाने आणि अर्थसहाय्य 1 लाख रुपये, संकीर्ण खर्च १५ लाख ४० हजार रुपये एकुण खर्च ११ कोटी ४२ लाख २० हजार रुपये स्थिर व जंगम मत्ता ५८ कोटी  ७० लाख २१ हजार रुपये गुतवणुका साठी १० लाख कीरकोळ ऋणको साठी  ५ कोटी ५४ लाख २१ हजार रुपये  शासन अनुदाने, ठेवी  २८ लाख रोख आणि बँक शिल्लक ३ लाख अशी एकूण भाडवली खर्च  ६४ कोटी ६५ लाख ४२ हजार रुपये अपेक्षीत धरण्‍यात आला आहे.

  नगरपरिषदेने २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात विविध विकास कामे व इतर खर्चासाठी पुढील प्रमाणे अपेक्षीत खर्च धरला आहे. ग्रंथ परिगणेसह संगणीकरण करण्‍यासाठी ५ लाख रुपये, बुककेस खरेदी ग्रंथासाठी ३ लाख, रस्‍ते दुरुस्ती १० लाख, कोव्हीड १९ उपाययोजनासाठी २ लाख ,खासदार निधी २० लाख, नागरी दलित्तेतर विकास योजना ५० लाख, वैशिष्‍ट्यपुर्ण योजना ३ कोटी , वैशिष्‍ट्यपुर्ण कामासाठीविशेष अनुदान  योजना ४ कोटी, १४ वा वित्त आयोग निधी ४ कोटी ५० लाख, १५ वा वित्त आयोग ५ कोटी, भुयारी गटार योजना २० कोटी, जलतरण तलाव ५० लाख, रस्ते विकास योजना साठी ५० लाख विशेष रस्ता अनुदान ३ कोटी, घरकुल योजनांसाठी सर्वासाठी प्रधानमंत्री आवास योजना ४ कोटी व रमाई आवास योजनेसाठी १ कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे.

    या अंदाजपत्रकावर  नगराध्यक्ष सत्यजित कदम, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री.प्रकाश मार्शल संसारे, बांधकाम समिती सभापती श्री ज्ञानेश्‍वर देवराम वाणी, आरोग्य  समिती सभापती श्री सचिन सिताराम ढुस, महिला व बाल कल्याण समिती सभापती, सौ.नंदा एकनाथ बनकर, महिला व बाल कल्याण समिती उपसभापती सौ.उर्मिला भारत शेटे, श्री आदिनाथ रंभाजी कराळे, ,श्री.बाळासाहेब  जगन्नाथ खुरुद, श्री.संजय सोपान बर्डे , श्री  शैलेंद्र शरदचंद्र कदम, श्री. शिवाजी बाबुराव मुसमाडे, सौ अंजली अमोल कदम, सौ सुजाता सुधाकर  कदम , सौ. कमल दत्तू सरोदे, सौ.केशरबाई दशरथ खांदे, सौ.सुनिता सुरेंद्र थोरात आदिनी नगरपरिषदेच्‍या अंदाजपत्रकावर सविस्‍तर चर्चा केली. यावेळी अंदाजपत्रकाचे वाचन लेखापाल कपिल भावसार, अजय कासार,  आदिनी केले . सभेचे कामकाज  प्रशासन अधिकारी श्री बन्सी वाळके, श्री.मुकूंद ढुस यांनी पाहिले.


घरकुल योजनेसाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद: प्रकाश संसारे

देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी असलेली २०२२ पर्यंत ''सर्वांसाठी घरे''  प्रधानमंत्री आवास योजना आपल्या शहरात प्रभावशाली राबविली जात आहे, एकूण २२३ घराचं उद्दिष्ट असतांना आपल्या नगरपरिषदेने पहिल्या टप्प्यात ३६६ घरकुलांना मंजुरी मिळवली त्यातील जवळपास २५० लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून घरांची कामे सुरू केली आहेत, त्यातील ३० घरकुले पूर्ण झाली आहेत व उर्वरित घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत  नुकतीच नव्याने दुसऱ्या टप्प्यातील १५९ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे तिसऱ्या टप्प्यात अर्ज केलेल्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्याचा प्रस्ताव शासनास सादर केला जाणार आहे, घरे बांधण्यासाठी स्वतःची जागा नसलेल्या कुटुंबांचा घरकुलांचा स्वतंत्र प्रस्ताव शासनास सादर केला जाणार आहे,  यावेळी माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रकाश संसारे म्हणाले, मा. आ. चंद्रशेखर कदम यांचे स्वप्नवत असलेले शहरातील प्रत्येक कुटुंबास स्वतःचे  "हक्काचे पक्के घर"  उद्दिष्टे पूर्णत्वास नेण्यासाठी  नगरपरिषदेच्या या वर्षाच्या अर्थसंकल्पात घरकुल योजनांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे त्यात  'प्रधानमंत्री आवास योजना' व 'रमाई आवास योजनेचा' समावेश आहे, या घरकुल योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी नगरपरिषदेकडे अर्ज करून लाभ घ्यावा असे आव्हान नगरपरिषदेचे वतीने करण्यात येत आहे असे यावेळी प्रकाश संसारे म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत