राहूरी(वेबटीम) राहूरी तालुक्यातील शिवदुर्ग ओढ सह्याद्रीची या ग्रुपच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नाशिक येथील किल्ले रामश...
राहूरी(वेबटीम)
राहूरी तालुक्यातील शिवदुर्ग ओढ सह्याद्रीची या ग्रुपच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नाशिक येथील किल्ले रामशेज या ठिकाणी जावून वृक्षारोपण केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती ठिकठिकाणी साजरी होत असताना सर्वत्र विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले. राहूरी येथील शिवदुर्ग ओढ सह्याद्रीची या ग्रुपच्या सदस्यांनी शिवजयंती दिनी नाशिक येथील रामशेज किल्ला परिसरात जावून वृक्षारोपण केले.
यावेळी अँड.प्रसाद कोळसे, शरद म्हसे, प्रतीक मुसमाडे, अँड.शशिकांत शिरसाठ, प्रवीण वराळे आदी उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रत्येक शिवजयंतीदिनी महाराष्ट्रातील विविध किल्ल्यावर जावून वृक्षारोपण करण्याचा संकल्प यावेळी 'शिवदुर्ग ओढ सह्याद्रीची' ग्रुपच्यावतीने करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत