युगपुरुषांचा आदर्श तरुणांनी डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करावी- शेलार महाराज - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

युगपुरुषांचा आदर्श तरुणांनी डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करावी- शेलार महाराज

  वळण (प्रतिनिधी) प्रवाहाला थोपावतो तो खरा युगपुरूष असतो. स्वराज्यावर मुघलांचे राज्य होतं म्हणून मुघलांचा प्रवाह थोपवुन कमी वयात देखील स्वरा...

 वळण (प्रतिनिधी)

प्रवाहाला थोपावतो तो खरा युगपुरूष असतो. स्वराज्यावर मुघलांचे राज्य होतं म्हणून मुघलांचा प्रवाह थोपवुन कमी वयात देखील स्वराज्याची निर्मीती ज्यांनी केली ते छञपती युगपुरूष ठरले.स्वतंञ स्वातंञ निर्मान करने म्हणजे खरा पुरूषार्थ आणि तोच पुरूषार्थ माझ्या राजाने मिळवला म्हणून महाराष्ट्राचे आरध्य दैवत छञपती शिवाजी महाराज ठरले.त्यामुळेच आज त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आज तरूणांनी अशा युगपुरूषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे असे प्रदिपादन ह.भ.प.शिवचरीञकार मधुकर महाराज शेलार(मालेगाव) यांनी केल आहे.ते वळण येथे बोलत होते.

     वळण (ता.राहुरी) येथे १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमीत्ताने शिवकिर्तनाचे आयोजन केले होते यावेळी महाराज यांनी शिवचरीञावर प्रबोधन करताना छञपतींचे अनेक इतिहास कालिन दाखले देऊन शिवचरीञावर प्रकाश टाकला तसेच माॅ साहेब जिजाऊ ,छञपती संभाजी राजे,महात्मा जोतिबा फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले,झाशीची राणी आदि युगपुरूषांचा पुरूषार्थ कशा प्रकारे होता त्यांनी समाजाला काय दिले काय करून दाखवले म्हणून इतिहास घडला आदी वेगवेगळ्या पुरूषार्थाचे दाखले देत प्रबोधनपर किर्तन केले.

सार्वजनिक शिवजयंती उत्साहानित्ताने शुक्रवारी सकाळी हनुमान मंदिरासमोर प्रमुख मान्यवरांसह शिवप्रेमींनी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.त्यानंतर मंदिराच्या सभागृहात भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.


सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत अश्वावरून बाल शिवरायांची मिरवणुक काढली.सायंकाळी शिवचरीञकार ह.भ.प.शेलार महाराज यांचे शिवकिर्तन संपन्न झाले. रक्तदान, मिरवणुकीत अनेकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तरूण शिवप्रेमींनी अधिक परीश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत