राहूरी(श्रीकांत जाधव) कोरोना रूग्ण वाढत असल्याने सरकारने कडक उपाययोजना करण्याचे आदेश दिले असल्याने आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी रा...
राहूरी(श्रीकांत जाधव)
कोरोना रूग्ण वाढत असल्याने सरकारने कडक उपाययोजना करण्याचे आदेश दिले असल्याने आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी राहूरी शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर महसूल व पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी कोरोना रूग्ण वाढत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना कडक उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी तालुकावाईज महसूल व पोलीस प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिले असताना आज दिनांक १९ फेब्रुवारी पासून राहुरीत उपविभाग अधिकारी दयानंद जगताप,राहुरी तहसिलदार फसियोद्दीन शेख साहेब, निवासी नायब तहसिलदार गणेश तळेकर, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी रस्त्यावर येऊन विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे.
शिवजयंती निमित्त अनेक तरुण आज विनामास्क मोठ्या उत्साहाने फिरत असताना अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे तरुणांच्या खिशाला खात्री लागली.कोरोना संसर्ग वाढवू नये म्हणून प्रत्येक नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.सोशल डिस्टनसिंग, मास्क, सॅनेटायझर आदी गोष्टींचा अवलंब करावा असे आवाहन महसूल व पोलीस प्रशासनाने केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत