कणगर येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कणगर येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

  राहूरी फॅक्टरी(वेबटीम) राहूरी तालुक्यातील कणगर येथे कर्जाला कंटाळून आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्...

 राहूरी फॅक्टरी(वेबटीम)

राहूरी तालुक्यातील कणगर येथे कर्जाला कंटाळून आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

 कणगर- तांभेरे रोडवरील माळवाडी परिसरातील शेतकरी बापूसाहेब लक्ष्मण हापसे(वय-४५) हे शेती करून आपली रोजीरोटी चालवितात.अडीच एकर शेती असून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर प्रपंच करावा की कर्ज भरावे असा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला होता. त्यांच्यावर असणारे कर्ज थकले असल्याने गेल्या काही दिवसांपासून ताणतणावात होते असे नातेवाईकांनी सांगितले.

  बापूसाहेब हापसे गेल्या दोन दिवसांपासून ते राहत्या घरातून बेपत्ता होते. त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही.दरम्यान आज दुपारी एका शेतात पडक्या घरात आत्महत्या केलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह मिळून आला. साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केली असावी असे मृतदेहाच्या स्थितीवरून दिसून आले.

 दरम्यान घटनेची माहिती समजताच गावचे सरपंच सर्जेराव घाडगे, पोलीस पाटील बाळासाहेब मुसमाडे, सुरेश घाडगे, जयसिंग घाडगे, जालिंदर गागरे, सचिन गाडे, भानुदास गागरे आदींनी मदत केली. त्यानंतर बापूसाहेब हापसे यांचा मृतदेह साई प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेद्वारे राहूरी येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मयत बापूसाहेब हापसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

दरम्यान कर्जाला कंटाळून बापूसाहेब हापसे यांनी आत्महत्या केली असल्याचे नातेवाईक मंडळीकडून समजले असून शासनाने कुटूंबियांना आर्थिक मदत करावी अशी मागणी सरपंच सर्जेराव घाडगे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत