कोपरगाव(वेबटीम) हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय युवकांसाठी चिरंतन स्फुर्तीस्थान आहेत असे विचार शिवचरित्रकार प्रशांत टेके यांनी संवत्...
कोपरगाव(वेबटीम)
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय युवकांसाठी चिरंतन स्फुर्तीस्थान आहेत असे विचार शिवचरित्रकार प्रशांत टेके यांनी संवत्सर या ठिकाणी शिवजन्मोत्सवातील व्याख्यानातून मांडले.
तालुक्यातील संवत्सर येथे ३९१ व्या शिवजयंती उत्सवाचे आयोजन शिवराय प्रतिष्ठाणने केले होते. कार्यक्रमाचा शुभारंभ दिप प्रज्वलन व शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन झाला. या कार्यक्रमास अनेक मान्यवरांसह शिवप्रेमी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी शिवचरित्रकार प्रशांत टेके यांनी शिवचरित्रातील अनेक पैलूंचा उलगडा विस्तृतपणे धारदार आवाजात केला.
त्यामध्ये प्रामुख्याने शिवछत्रपतीच्या कार्यकाळाच्या पुर्वीची भयावह व अतोनात अत्याचाराने पिडीत तत्कालीन महाराष्ट्राच्या परिस्थितीचे विवरण, शिवनेरी किल्ल्यावर साजरा झालेला दैदिप्तीमान शिवजन्मोत्सव, राजमाता जिजाऊ साहेबांनी बालशिवबांवर केलेले प्रेरणादायी संस्कार, हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ, राझ्यांच्या अत्याचारी पाटलाचा चौरंगा, अफजलखाना वध, शाहास्थाखानाची फजिती आदी प्रमुख प्रसंगासह छत्रपती शिवरायांच्या जिवनात घडलेले अनेक छोट्यामोठ्या प्रसंगाचे यथोचित मांडणी यावेळी केली.तसेच शिवभक्त युवकांनी शिवजन्मोत्सवा निमित्ताने शिवछत्रपतींना अभिप्रेत असलेले विचार आचरणात आणण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत