कोपरगाव प्रतिनिधी तेजस्वीनी महाराष्ट्र महिला सक्षमीकरण काकिम अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ,अहमदनगर मार्गदर्शीत स्त्री शक्ती लोकसंचलित...
कोपरगाव प्रतिनिधी
तेजस्वीनी महाराष्ट्र महिला सक्षमीकरण काकिम अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ,अहमदनगर मार्गदर्शीत स्त्री शक्ती लोकसंचलित साधन केंद्र राहता यांच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली.तसेच श्रीच्या प्रतिमेचे पुजन करत उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवरायांचे विचार आपल्या भाषणातून व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून स्त्री शक्ती लोकसंचलित साधन केंद्र राहता येथील कार्यकारिणी तसेच अध्यक्षा राजश्री डांगे, तसेच सी एम आर सी चे सर्व कर्मचारी वर्ग व महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. या वेळी सर्वांनी छत्रपती शिवरायांचा जयघोष करत कार्यक्रमाची सांगता केली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत