'ती' जागा ग्रामपंचायतीस हस्तांतरीत करा-वतहसीलदार शेख - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

'ती' जागा ग्रामपंचायतीस हस्तांतरीत करा-वतहसीलदार शेख

राहूरी/प्रतिनिधी         राहुरी तालुक्यातील खडांबे बुद्रुक येथील लोकल बोर्डाच्या जागेवरील असलेले अतिक्रमण हटवून सदरील जागा ग्रामपंचायतीस हस्...

राहूरी/प्रतिनिधी 

       राहुरी तालुक्यातील खडांबे बुद्रुक येथील लोकल बोर्डाच्या जागेवरील असलेले अतिक्रमण हटवून सदरील जागा ग्रामपंचायतीस हस्तांतरित करावी असे आदेश तहसीलदार शेख यांनी दिले आहेत. 

           खडांबे बुद्रुक येथील लोकल बोर्डाच्या जागेवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण होते.सदर जागेवरील अतिक्रमण हटवुन गावातील बेघर लोकांना घरकुलासाठी तसेच गावातील विविध विकास कामे करण्यासाठी येथील अतिक्रमण हटवावे अशी मागणी ग्रामपंचायतीने केली होती. याच संदर्भात नुकतेच गावामधे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी भेट देऊन पोलिस निरीक्षक हनुमंतराव गाडे तसेच गावातील प्रमुख नागरिकांसमावेत बैठक घेऊन अधिका-यांना आणि ग्रामस्थांना विविध सुचना केल्या आहेत तसेच येथील काचोळे-गायके वस्ती कडे जाणारा रस्ता देखील खुला करावा आणि मुळा डॅम फाटा येथील सहकारी सोसायटी वरील असणारे अतिक्रमण हटवून देखील तेथे राहण्यासाठी जागा उपलब्ध करावी असे आदेश देखील तहसीलदार शेख यांनी दिली.

याप्रसंगी सरपंच कैलास पवार,तलाठी कदम, ग्रामसेवक डावरे, चारुदत्त पवार, बाळासाहेब पवार, कैलास आवटे, सुनील जठार,जयसिंग पवार, सुनील काचोळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत