कोपरगाव (प्रतिनिधी) परम सदगुरु श्री. शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट कोपरगांव बेट तर्फे साजरा केला जाणारा मंदिराचा सर्वात मोठा वार्षिक उत्...
कोपरगाव (प्रतिनिधी)
परम सदगुरु श्री. शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट कोपरगांव बेट तर्फे साजरा केला जाणारा मंदिराचा सर्वात मोठा वार्षिक उत्सव श्री महाशिवरात्री या वर्षी गुरुवार दि ११ मार्च २०२१ रोजी येत आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात करण्याचे मंदिर प्रशासनाने ठरविले होते, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब म्हाकुजी आव्हाड यांनी सांगितले परंतु सध्या संपूर्ण जगभर निर्माण झालेल्या कोरोना-१९ महामारीचे संकट पहाता व आपल्या महाराष्ट्र राज्यात कोपरगांव भागात वाढत असलेली कोरोनाग्रस्तांची संख्या याचा विचार करता सरकारच्या नियमानुसार यावर्षी होणारा श्री महाशिवरात्री उत्सव रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
तरी सर्व भाविक भक्तांना मंदिर प्रशासनाचे वतीने विनंती आहे की, बेट देवस्थान तर्फे दरवर्षी साजरा केला जाणारा श्री महाशिवरात्रीचा उत्सव रद्द झाल्या कारणामुळे परम सद्गुरु श्री शुक्राचार्य महाराज मंदिर श्री महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर सर्व भक्तांसाठी बंद राहाणार आहे परंतु फेसबुक लाईव्ह द्वारे मंदिरातील पुजारी कडून होत असलेल्या पूजा आरती अभिषेक याचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाईल तरी सर्वांनी घरी बसून या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री शुक्राचार्य मंदिर प्रशासन कमिटीने केली आहे.
सदर प्रसंगी अँड .एस.डी.कुलकर्णी, अँड. दिलीप कोन्हाळकर, एस.एल कुलकर्णी, हेमंत पटवर्धन, तसेच सर्वश्री सचिन परदेशी, प्रसाद पन्हे. संजय वहांगळे, मुन्नाआव्हाड,विशाल राऊत, भाऊसाहेब आव्हाड, मधुकर साखरे, भागचंद रुईकर, नरेंद्र आव्हाड, बाळासाहेब लकारे, विलास आव्हाड, दिलीपराव सांगळे, आदिनाथ ढाकणे, बाळासाहेब गाडे, विलास नाना आव्हाड, विजय रोहम,रवि आढाव, तुषार आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत