जेऊर कुंभारीत शॉर्टसर्किटमुळे ऊस क्षेत्राचे लाखांचे नुकसान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जेऊर कुंभारीत शॉर्टसर्किटमुळे ऊस क्षेत्राचे लाखांचे नुकसान

कोपरगाव(वेबटीम)   कोपरगाव तालुक्यातील जेऊर येथील शेतकरी भगिरथ वक्ते यांच्या शेतातील दोन एकर क्षेत्रातील तोडण्यास आलेल्या ऊस पिका वरून गेलेल्...

कोपरगाव(वेबटीम)

  कोपरगाव तालुक्यातील जेऊर येथील शेतकरी भगिरथ वक्ते यांच्या शेतातील दोन एकर क्षेत्रातील तोडण्यास आलेल्या ऊस पिका वरून गेलेल्या विजेच्या ताराचे  शॉर्टसर्किट झाल्याने आग लागुन संपुर्ण उभे पिक आगीत भस्मसात झाले असून  अंदाजे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे .

       जेऊर कुंभारी परिसरातील गट नंबर ५५ /१  मध्ये भागिरथ सकाहरी वक्ते यांचा दोन एकर ऊस आगीत खाक झाला  या क्षेत्रात महावितरण कंपनिच्या विजेच्या तारा गेलेल्या आहेत. या तारा आज दुपारी चारच्या आसपास आग लागली .जाळाचे लोट ऊसावर पडल्याने संपुर्ण ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी गेला आहे. आग विझवण्यासाठी संजीवनी सहकारी साखर कारखाना यांचे आग्रिशमन दलाचे बंब येऊन त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु या आगीतमध्ये दोन एकर ऊसासह संपूर्ण क्षेत्रातील पाईप व इलेक्ट्रिक मोटार केबल आदीसह अंदाजे तीन लाख रुपये नुकसान झाल्याचे माजी सरपंच रमेश गोपिनाथ वक्ते यांनी सांगितले .

 या ठिकाणी झालेल्या नुकसान भरपाई महावितरण कंपनीने द्यावी अशी मागणी करण्यात आली . यावेळी महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब वक्ते, माजी सभापती शिवजीराव वक्ते, वसंतराव आव्हाड , निरीज रोहम , शिवजी यादव वक्ते, सोपानराव वक्ते , यशवंतराव आव्हाड , विजय लकारे, ग्रामसेवक केबी रनछोड ,तलाटी सुरेश जाधव यांनी घटनास्थळी  येऊन पाहणी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत