देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा नगर पालिकेतील सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक व बांधकाम सभापती ज्ञानेश्वर वाणी यांनी मंगळवारी दुपारी...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा नगर पालिकेतील सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक व बांधकाम सभापती ज्ञानेश्वर वाणी यांनी मंगळवारी दुपारी ४ वा.नगरसेवक पदाचा राजीनामा गटनेते सचिन ढुस यांच्याकडे दिला असता ढुस यांनी राजीनामा स्वीकारला नाही. दोन दिवस शांत विचार करुन नंतर निर्णय घ्या, दोन दिवसांनी पुन्हा राजीनामा देण्यास येईल तेव्हा राजीनामा स्वीकारावा लागेल.असे वाणी यांनी पञकारांशी बोलताना सांगितले.
देवळाली प्रवरा नगरपालिकेत भाजपाची सत्ता असुन पालिकेचा कारभार नेमका कोणाच्या हातात आहे. हे समजले नाही.सत्ताधारी गटातील अनेक नगरसेवकांमध्ये नाराजी असुन काही महिन्यापुर्वी अदिनाथ कराळे यांनी मुख्याधिकारी अजित निकत यांच्याकडे नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता.मंगळवारी दुपारी ४ वा.नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा घेवून मुख्याधिकारी निकत यांच्या दालनात दाखल झाले. त्यापुर्वी गटनेते सचिन ढुस यांना भ्रमणभाषवरुन राजीनाम्याची माहिती दिली.व पालिकेत येण्याची विनंती केली.
जवळपास १ तासभर मुख्याधिकारी निकत व गटनेते ढुस यांनी वाणी यांची मुख्याधिकारी यांच्या दालनात बसुन समजूत काढली.शांत मनाने विचार करा आणी मगच राजीनामा द्या असा सल्ला त्यांनी दिला. वाणी यांनी रागातच नगर पालिकेतून काढता पाय घेतला. मी दोन दिवसांनी पुन्हा राजीनामा देण्यासाठी जाईल. राजीनामा तर मी देणारच आहे. आगामी निवडणूकीत सत्ता घेवूनच पालिकेत येईल असे वाणी यांनी पञकारांशी बोलताना सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत