देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील रहिवासी ऋषिकेश विजय भागवत ( वय ३०) या कोपरगाव येथील संजीवनी पॉलीटेक्निकल कॉलेजच्या तरुण प्राध...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथील रहिवासी ऋषिकेश विजय भागवत ( वय ३०) या कोपरगाव येथील संजीवनी पॉलीटेक्निकल कॉलेजच्या तरुण प्राध्यापकाचा आज मंगळवार दिनांक १६फेब्रूवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सावळीविहीर येथे दुचाकी स्लीप झाल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या अवजड वाहन अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
देवळाली प्रवरा येथील रहिवासी व कोपरगाव येथील संजीवनी पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्राध्यापक पदावर सन २०१३ पासून कार्यरत असलेले ऋषिकेश विजय भागवत हे आपल्या दुचाकीवरून कोपरगावकडे जात असताना सावळीविहीर फाट्याजवळ दुचाकी स्लीप झाली. याच वेळी जड वाहनाच्या मागील चाकाखाली ऋषीकेश सापडून त्यांचा जागेवर मृत्य झाला. यावेळी रस्त्यावर रक्ताचे मोठे थारोळे साचले होते तर मेंदूचा काही भाग चक्क हेल्मेट मध्ये अडकून पडलेला होता. तर रोडवर शरीरातील मांस विखुरलेले होते . शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने दाखल होऊन मृतदेहाचा भाग गोळा करत पुढील प्रकियेसाठी दवाखान्यात पाठविण्यात आला. ह्या अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन भरधाव वेगाने निघून गेल्याने त्याचा शोध लागलेला नव्हता. घटनेचा पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहे या दृदैवी घटनेने देवळाली प्रवरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत