बंद केलेले डेडिकेटड कोविड सेंटर पुन्हा सुरु करा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बंद केलेले डेडिकेटड कोविड सेंटर पुन्हा सुरु करा

कोपरगांव(वेबटीम) दिवसेंदिवस रुग्णांची आकडेवारी कमी झालेली  असली तरी कोरोनाचे संकट अद्यापही कमी झालेले नाही, सर्वांनी आपले व आपल्या कुटुंबिया...

कोपरगांव(वेबटीम)

दिवसेंदिवस रुग्णांची आकडेवारी कमी झालेली  असली तरी कोरोनाचे संकट अद्यापही कमी झालेले नाही, सर्वांनी आपले व आपल्या कुटुंबियांची काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना आटोक्यात आल्याचे चित्र भासवत शासनाने जनतेसाठी मोफत सुरु केलेले डेडिकेटड कोविड सेंटर बंद केल्याने अनेक नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत असुन बंद केलेले डेडिकेटड कोविड सेंटर त्वरीत सुरु करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशसचिव माजी आमदार सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

करोनाचा हाहाकार हा गेल्या वर्षापासुन जगभरात सुरु आहेत, या संसर्ग विषाणुची विषयी अनेक अफवांमुळे अनेकांच्या मनात भितीचे वातावरण आजही निर्माण झाल्यामुळे नेमके आपल्या समोर संकट उभे राहिले तर करायचे तरी काय ? याबाबत अजुनही नागरिक संभ्रमात आहे, त्यात या राज्यसरकारने येत असलेले संकटाचे नियोजन, उपाय योजना, वेळेतच सुविधा तातडीने उभे केले असते तर नक्कीच जनतेची गैरसोय झाली नसतीण्

कोपरगांव तालुक्यातील सुविधा, उपचार, तपासणी बंद केल्याने अनेक नागरिक या जिल्हयातुन दुस-या जिल्हयात उपचारासाठी जात असल्याचे आजही निदर्शनास येत आहे. भविष्यात रुग्णांची संख्येत वाढ झाल्यास नागरिक आक्रमक भुमिका घेतील. यात कोणी कठोर पाऊले उचलु नये यासाठी बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा सुरु करुन एकाच छताखाली उपचार व तपासणी सुरु करावी जेणे करुन नागरिकांची गैरसोय होणार नाही.

देशभरात लस सुरु झालेली असली तरी अद्याप ती घराघरात गेलेली नाही, त्यात काही दिवसांपूर्वी जाहिर करण्यात आले होते दुस-या टप्यातील लाट ही जीवघेणा राहिल कोरोना ची रुग्णांची संख्या कमी झाली संकट अद्यापही कमी झालेेले नसतांना देखील नागरिकांचे सोय सुविधांसाठी असलेले डेडिकेटड कोविड सेटंर बंद केल्याचे जाहिर झाल्याने अनेकांची तपासणीपासुन ते उपचारापर्यंत सर्वच गैरसोय होत आहे, सेंटरच्या माध्यमातुन रुग्णंाची मोफत होत होती परंतु आता याच तपासणीला नागरिकांना खासगी ठिकाणी पैसे माजावे लागत आहे. नागरीकांची गैरसोय व समस्या सोडविण्यासाठी बंद केलेले डेडिकेटड कोविड सेंटर सुरु करणे तातडीने गरजेचे असल्याचे सौ. कोल्हे म्हणाले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत