देवळाली प्रवरा प्रतिनिधी देवळाली प्रवरा कामगार तलाठी कार्यालयाच्या पाठीमागिल ओढ्यालगतच्या पोलिस मैदानावर कोंबड्या व माशांचे म...
देवळाली प्रवरा प्रतिनिधी
देवळाली प्रवरा कामगार तलाठी कार्यालयाच्या पाठीमागिल ओढ्यालगतच्या पोलिस मैदानावर कोंबड्या व माशांचे मांसाचे तुकडे उघड्यावर टाकून बर्डफ्लूला आमंञण दिले जात आहे. आठवडे बाजारातील मांस विक्रेते बाजार संपल्यावर उघड्यावर मांसाचे तुकडे टाकून निघून जातात.दुसऱ्या दिवशी सकाळी मांसाचे तुकडे खाण्यासाठी मैदानावर कावळ्यांचा थवा, मोकाट कुञे जमतात यामुळे बर्डफ्लू सारखा आजार पसण्याचा धोका काही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की देवळाली प्रवरा आठवडे बाजार शनिवारी भरत असुन पोलिस मैदानावर कोंबडीचे मांस, मासे, बोंबिल विक्री करण्यासाठी स्वतंञ बाजार भरला जातो. मासे व मांसाची मोठ्या प्रमाणात विक्री होते.मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. या बाजारात मांस व माशे बोबिंल विक्रेते मोठ्या प्रमाणात आहे.दिवसभर कोंबडीचे पंख व इतर नको असलेला भाग एका ठिकाणी ठेवून संध्याकाळी हे व्यापारी मांसाचे तुकडे जागेवर टाकून निघून जातात. रविवारी सकाळी मांसाचे तुकडे खाण्यासाठी कावळ्यांचे थवे व मोकाट कुञे मोठ्या प्रमाणात जमतात. कावळे व कुञ्यां पासुन नागरीकांना मोठ्या प्रमाणात ञास होतो. नगर पालिका या भागातील स्वच्छता उशिरा करते.
मांस व माशांचे तुकडे उघड्यावर टाकले जाणे हिताचे नसुन कोंबडीच्या विष्ठे पासुन ते मांसाच्याभागा मुळे बर्डफ्लू सारखा आजार पक्षांना होण्याची भिती काही तज्ञ पशु वैद्यकीय अधिकारी यांनी मत व्यक्त केले आहे.त्यामुळे बाजारकरुंनी उघड्यावर मांसाचे तुकडे टाकू नये उघड्यावर मांसाचे तुकडे टाकणाऱ्या व्यापाऱ्या विरोधात काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
"पोलिस मैदानावर मांस विक्रीचा बाजार भरला जातो.या ठिकाणी मांस विकणारे व्यापारी संध्याकाळी बाजार संपल्यावर वेस्टेज मांसाचे तुकडे उघड्यावर टाकतात.रविवारी सकाळी पोलिस मैदानाची स्वच्छता केली जाते मांसाचे तुकडे एकञित जमा करुन ते एका खड्ड्यात पुरुन विल्हेवाट लावली जाते. मी स्वतः पोलिस मैदानाची पाहणी केली आहे. मैदान पुर्ण स्वच्छ करण्यात आले आहे. पुढील शनिवारी मांस विक्रेते व्यापाऱ्याना सुचना देवून उघड्यावर मांसाचे तुकडे टाकू दिले जाणार नाही.असे मुख्याधिकारी अजित निकत यांनी सांगितले."



कोणत्याही टिप्पण्या नाहीत