आधी रक्तदान मगच बोहल्यावर चढणार ... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आधी रक्तदान मगच बोहल्यावर चढणार ...

वळण/ गोविंद फुणगे      आधी रक्तदान मगच विवाह सोहळा राहुरी येथील पत्रकार भाऊसाहेब येवले यांचे चिरंजीव ऋषिकेश येवले तसेच पिंप्री-वळण येथील दाद...

वळण/ गोविंद फुणगे 

    आधी रक्तदान मगच विवाह सोहळा राहुरी येथील पत्रकार भाऊसाहेब येवले यांचे चिरंजीव ऋषिकेश येवले तसेच पिंप्री-वळण येथील दादासाहेब लहारे यांची कन्या स्वप्नाली लहारे  यांचा १४ फेब्रुवारी रोजी नियोजित विवाह समारंभ आहे परंतु विवाह समारंभापूर्वी वर आणि वधू यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला आहे. आज दि ३ फेब्रुवारी रोजी रोटरी क्लॅब राहुरी येथे हे रक्तदान शिबिर संपन्न झाले. 

  अखिल भारतीय क्रांती सेना, श्री संत सावता माळी युवक संघटना, प्रहार संघटना यांच्या संयुक्त  विद्यमाने हा  दिवसापूर्वी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सध्या रक्तदानाचा तुटवडा जाणवत असून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदांत हेतूने येवले व लहारे कुटुंबियांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजन केल होतं.

         प्रसंगी अखिल भारतीय क्रांतीसेना राज्य संपर्कप्रमुख मधुकर, म्हसे श्री संत सावता माळी युवक  संघटक जिल्हा अध्यक्ष अशोक तुपे, प्रहार संघटना योगेश लबडे, डॉ जयंत कुलकर्णी ,भाऊसाहेब येवले, दादासाहेब लहारे, धनंजय लहारे,आकाश  धरम , आकाश येवले, शेखर पवार ज्ञानेश्वर भिंगारदेवे संदीप मोहोळ, रवींद्र गाडेकर, शिवाजी कोळसे, अनिष पटेल, आदिनाथ पवार, आरिफ शेख, सुनील शिंदे, गणेश मिरीकर, भारत सत्रे, शुभम घाडगे, बंटी  भालके, दीपक साखरे आदी यावेळी उपस्थित  होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत