देवळाली प्रवरा प्रतिनिधी देवळाली प्रवरा येथील कदम भागातील देशमुख विज रोहिञ जळाल्याने या भागातील शेतकरी अंधरात तर पिक पाण्या...
देवळाली प्रवरा प्रतिनिधी
देवळाली प्रवरा येथील कदम भागातील देशमुख विज रोहिञ जळाल्याने या भागातील शेतकरी अंधरात तर पिक पाण्यावाचुन करपले होते.रोहिञ चालू करण्यासाठी विज बिल भरण्याचे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.देवळाली प्रवरा नगर पालिकेचे नगरसेवक अदिनाथ कराळे यांनी राज्यमंञी प्राजक्त तनपुरे यांच्याकडे विज रोहिञ बसुन देण्याची मागणी केली.अवघ्या चार तासात कदम वस्तीवरील देशमुख विजरोहिञ बसवल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, देवळाली प्रवरा कदम वस्ती भागातील देशमुख विज रोहिञ गेल्या आठ दहा दिवसापुर्वी जळाले होते. या भागातील शेतकरी एकञ येत स्थानिक नेत्या मार्फत महावितरणाच्या अधिकाऱ्यांना भेटले परंतू अधिकाऱ्यांनी देशमुख विज रोहिञा वरील शेतकऱ्यांनी 50 टक्के विज बिल भरावे त्यानंतरच नविन विज रोहिञ बसवण्यात येईल असे सांगितले.सध्या शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे विज बिले भरु शकत नाही ऊसाचे व गहु पिक निघाल्यानंतर विज बिल भरण्याचे आश्वासन शेतकऱ्यांनी दिले. परंतू अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला.
हाता तोंडाशि आलेली पिके पाण्या अभावी जातील या भितीने शेतकरी हतबल झाला.अखेर देवळाली प्रवरा नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अनंत कदम यांनी स्थानिक शेतकऱ्यांसह विद्यमान नगरसेवक अदिनाथ कराळे यांची भेट घेवून राज्यमंञी तनपुरे यांच्याकडे विज रोहिञाची मागणी करा व आमची समस्या त्यांच्या जवळ मांडा असा अग्रह धरला. कराळे यांनी राज्यमंञी तनपुरे यांना भ्रमणभाषवर संपर्क साधुन शेतकऱ्यांची समस्या सांगितली.ना.तनपुरे यांनी सायंकाळ पर्यंत विज रोहिञ बसुन मिळेल असे सांगितले.तसे आदेश हि महावितरणाच्या अधिकाऱ्यांना दिले.राज्यमंञी यांच्या आदेशामुळे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी अवघ्या चार तासात विज रोहिञ बसवून दिले.विज रोहिञ बसवल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. स्थानिक शेतकऱ्यांसह अनंत कदम यांनी ना.तनपुरे यांच्यासह नगरसेवक अदिनाथ कराळे यांचे आभार मानले.
ना.तनपुरेंची कार्यत्पतरता!
देवळाली प्रवरा शहरात तीन ते चार महिण्यांनी देवळाली सोसायटी तर आँक्टोबर महिण्यात नगर पालिकेची निवडणूक होवू घातली आहे.ना.प्राजक्त तनपुरे यांना देवळाली प्रवरा सोसायटी व नगर पालिका या दोन्ही सत्ता काबिज करायच्या असल्याने सध्या कार्यकर्ते मार्फत येणारी कामे तातडीने केली जात आहे.जनमाणसात राज्यमंञी कामाबाबत कार्यतत्परता दाखवित आहे.राज्यमंञी यांच्याकडे सर्वसामान्य व्यक्ती काम घेवून गेली तरी राजकारण बाजुला ठेवून ना.तनपुरे काम करीत असल्याने राहुरी तालुक्यात कामाचा माणूस म्हणून पाहिले जात आहे."


कोणत्याही टिप्पण्या नाहीत