एससी आरक्षण वर्गीकरण लढा ही लोक चळवळ व्हावी- प्रा रामचंद्र भरांडे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

एससी आरक्षण वर्गीकरण लढा ही लोक चळवळ व्हावी- प्रा रामचंद्र भरांडे

कोपरगाव(वेबटीम) एससी आरक्षण लढा हा कोण्या एका संघटनेचा अगर नेत्यांचा लढा नसून ती लोक चळवळ व्हावी असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्था...

कोपरगाव(वेबटीम)

एससी आरक्षण लढा हा कोण्या एका संघटनेचा अगर नेत्यांचा लढा नसून ती लोक चळवळ व्हावी असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक  अध्यक्ष प्रा. रामचंद्र भरांडे  यांनी व्यक्त केले.

नुकतेच एससी आरक्षण वर्गीकरण दहा लाख सह्यांच्या मोहीम या उपक्रमात राहुरी येथे आयोजित समाज बांधवांनी बैठकीचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रस्थाविक युवा नेते कांतीलाल जगधने यांनी केले.

यावेळी बोलताना लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्र भरांडे  पुढे म्हणाले की, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ या जात समूहातील जातींना सम प्रमाणात झाला नाही. त्यामुळे महात्मा फुले,छ शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर या  महापुरुषांच्या सामाजिक न्यायचे धोरण व स्वप्न पूर्ण झाले नाही आजही या जात समूहातील अनेक जाती सामाजिक ,शैक्षणिक,आर्थिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत मात्र या सर्व उपेक्षित जातींना आरक्षणाचा लाभ व्हावा म्हणून एससी आरक्षण वर्गीकरण लढा उभारला असून या लढ्यात सर्वच समाज संघटनांनी सहभागी होऊन या वर्गीकरण लढ्याची लोक चळवळ व्हावी तरच या लढ्याला गती मिळेल.

या वेळी बोलताना लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष यांनी आरक्षण वर्गीकरण लढ्याची माहिती देऊन या कृती समिती मध्ये मातंग,मादगी,मांग गारुडी, मेहतर, मोची, आदी समाज संघटना सहभागी झाल्या असल्याची माहिती दिली.

या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एकनाथ मारूती जगधने यांनी स्वीकारले  या वेळी प्रा. अनिल दिनकर जगधने, निलेश मच्छींद्र जगधने,बाबाजी जगधने, दिपक आव्हाड यांनी आपले विचार मांडले .

  या बैठकीस  सोन्याबापू जगधने, पत्रकार राजेंद्र वसंतराव जगधने, विश्वास संतराम जगधने ,संतोष राघुदास जगधने, सचिन सुधाकर जगधने, सुनिल दिनकर जगधने, दावीद गंगाधर जगधने ,चंद्रकांत जगधने, आकाश जगधने, पप्पू जगधने , भैय्या जगधने व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी या लढ्यात राहुरी तालुक्यातून जास्तीत जास्त सहभागी होऊ असे आश्वासन सहभागी नागरिकांनी दिले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत