देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा नगर पालिकेची निवडणूक काही महिन्यावर येवून ठेपली असताना सत्ताधारी गटातील नगरसेवक एका पाठो...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा नगर पालिकेची निवडणूक काही महिन्यावर येवून ठेपली असताना सत्ताधारी गटातील नगरसेवक एका पाठोपाठ राजीनामा देण्याची भाषा करीत असल्याने सत्ताधारी गटातील सर्वच नगरसेवकांची शनिवारी सकाळी बैठक बोलविण्यात आली होती.या बैठकीत नाराज नगरसेवकांची नाराजी दुर करण्यासाठी चर्चा करण्यात आली.परंतू नगरसेवकांची नाराजी दुर झालीच नाही.नाराजीवर माञ तीन तास चर्चा झाली.अखेर बैठकी नंतरही नगरसेवक नाराज राहिल्याने बैठकीला बैठकीला पुर्ण विराम द्यावा लागला.
नगर पालिकेत चार दिवसापुर्वी नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा गटनेते सचिन ढुस यांच्याकडे दिला.परंतू ढुस यांनी राजीनामा स्वीकारला नाही.मुख्याधिकारी अजित निकत यांच्या दालनात गटनेते सचिन ढुस, मुख्याधिकारी निकत व एक पञकार यांनी नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी यांची समजूत काढली राजीनामा देवू नका, शांत मनाने एकदा विचार करा, यावर वाणी तावातावाने निघुन गेले. दोन दिवसांनी पुन्हा येईल राजीनामा देईल असा इशारा जाता जाता दिला होता.काही महिन्यापुर्वी अदिनाथ कराळे यांनी राजीनामा दिला होता.परंतू तो मंजूर करण्यात आला नाही.
नगरसेवकांची नाराजी व राजीनामा नाट्य एका मागोमाग घटना घडल्यामुळे नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे,गटनेते सचिन ढुस यांनी शनिवारी सकाळी बागायत पिक सोसायटीच्या सभागृहात सत्ताधारी गटातील सर्व नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती.या बैठकीत राजीनामा देणाऱ्या नगरसेवकांविषयी प्रथम चर्चा करण्यात आली. राजीनामा देण्याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.समोर आलेली कारणे यावर विचार विनिमय करुन यापुढे असे घडणार नाही याची दक्षता घेण्याचे ठरल्याचे समजते.नगरसेवकांची नाराजी काय आहे.हे जाणून घेण्यासाठी नगरसेवकांना कोणाची काय नाराजी आहे. हे याच बैठकीत स्पष्ट सांगा असे नगराध्यक्ष कदम यांनी फर्मान सोडले.नाराज नगसेवकांनी आपली नाराजी बोलुन दाखविली असल्याचे समजते. त्यामध्ये बहुतांशी नगरसेवकांनी नगर पालिकेत व पालिकेशी संबधित कार्यक्रमात मान सन्मान मिळत नाही.आम्ही नावालाच नगरसेवक आहोत.आमचे पालिका अधिकारीसुद्धा ऐकत नाही.अशा अनेक तक्रारी नगरसेवकांनी मांडल्या,महिला नगरसेवकांनी पुरुष नगरसेवकांच्या सुरात सूर मिसळल्याचे चर्चेतुन समजते.
यावर नगराध्यक्ष कदम, उपनगराध्यक्ष संसारे,गटनेते ढुस यांनी नगरसेवकांनी वेळीच समस्या मांडल्यातर त्यावर मार्ग काढता येवू शकतो.नगरसेवक जर वेळीच बोलणार नसतील नगरसेवकांच्या समस्या समजणार आहे का? नगरसेवकांनी चर्चा केली पाहिजे,चर्चेतून मार्ग निघतो.शांत राहुन राजीनाम्याची भाषा करणे म्हणजे समस्याचे उत्तर नाही. यासाठी तीन तास बैठक घेण्यात आली.तीन तासाच्या बैठकी नंतरही नगरसेवक माञ नाराजच राहिले असल्याची चर्चा नगरसेवक एकमेकात करीत असल्याचे ऐकवयास मिळत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत