राहूरी फॅक्टरी प्रतिनिधी राहूरी कारखाना परिसरातील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत असून शनिवारी सकाळी समर्थनगर परिसरात एका महिलेच्या गळ्...
राहूरी फॅक्टरी प्रतिनिधी
राहूरी कारखाना परिसरातील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत असून शनिवारी सकाळी समर्थनगर परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोने ओरबडण्याचा प्रयत्न अज्ञात दोन चोरट्यांनी केला. त्या चोरट्यांच्या हातात सोने लागले नाही.
या वेळी घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या मोनिका धाडगे यांनी आरडाओरडा केल्याने स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली. काही तरुणांनी तात्काळ आपआपल्या दुचाक्या काढून सर्व रस्ते पिंजून काढले मात्र ते दोन भामटे मिळून आले नाही. दरम्यान पल्सर दुचाकीवरून येवून धूमस्टाईल चोरी करणारे दोन अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.
राहुरी तालुक्यात गुन्हेगारी वाढतच चालली आहे.पोलिसांचा गुन्हेगारावरील वचक कमी झाल्याने गुन्हेगारही भर दिवसा लुटमार करीत आहे. काही दिवसापुर्वीच राहुरी कारखाना येथे देवळाली प्रवरा व राहुरी कारखाना परीसरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.यावेळी पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी गुन्हेगारी कमी करण्याचे अभिवचन दिले.परंतू गुन्हेगारी कमी होण्या ऐवजी दिवसा ढवळ्या लुटमारीच्या घटना घडू लागल्याने गुन्हेगारांची दहशत वाढत चालली आहे.गुन्हेगारांवर पोलिसांची दहशत कधी वाढणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरीक करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत