कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव नगरपालिका सर्वसाधारण सभा नुकतीच नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यासर्वसाधारण सभेत स्वतःच्या ...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव नगरपालिका सर्वसाधारण सभा नुकतीच नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यासर्वसाधारण सभेत स्वतःच्या अधिकारात असलेल्या आयत्या वेळच्या विषयात नामांतराचे ठराव मंजूर करण्यात आले.
यामध्ये 1) शिंदे शिंगी नगर येथील जलकुंभास "भगवान महावीर जलकुंभ" 2) वडांगळे वस्ती-स्टेशन रोड जलकुंभास " नेताजी सुभाषचंद्र बोस जलकुंभ" त्याचप्रमाणे गोदावरी लहानपुल ते शुक्राचार्य मंदिर(बेट) रस्त्याचे परम सद्गुरू श्री.शुक्राचार्य महाराज पालखी मार्ग" अशी नांवे देण्याचा निर्णय झाला.
यापुर्वी 1) गोरोबा नगर जलकुंभाचे "श्री संत गोरोबाकाका जलकुंभ" 2) समता नगर जलकुंभाचे " क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले" जलकुंभ3) जलशुद्धीकरण केंद्र जलकुंभास " स्व.बाळासाहेब सातभाई जलकुंभ" 4) " पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलकुंभ" 5) " पं. दीनदयाळ उपाध्याय अग्निशमन केंद्र"
6) "आद्य क्रांतिकारक राधोजी भांगरे" बाजार ओटे असे नामकरण केलेले आहे.सामाजिक,राष्ट्रीय भान ठेवून सर्वसमावेशक नामकरण करण्यात आलेले आहे अशी माहिती नगराध्यक्ष विजय वाहडणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत