राहूरी फॅक्टरी(वेबटीम) राहूरी फॅक्टरी येथे दर रविवारी भरणाऱ्या बाजारातून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले असून आज सकाळी दोन मोबाईल चोरट्यांनी लं...
राहूरी फॅक्टरी(वेबटीम)
राहूरी फॅक्टरी येथे दर रविवारी भरणाऱ्या बाजारातून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले असून आज सकाळी दोन मोबाईल चोरट्यांनी लंपास केले आहे.
डॉ.तनपुरे कारखाना कामगार वसाहतीत दर रविवारी मोठ्या प्रमाणात बाजार भरला जातो.या ठिकाणी शेतकरी, व्यापारी व दुकानदार यांची सर्व प्रकारची दुकाने थाटली जातात. राहूरी फॅक्टरी बरोबरच आजूबाजूच्या नागरिकांची खरेदीसाठी दर रविवारी मोठी गर्दी होते. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे मोबाईल लंपास करून पसार होतात.प्रत्येक रविवारी एकतरी मोबाइल चोरी जाण्याचा प्रकार घडत आहे.
आज सकाळी बैलगाडी यार्ड येथील येथील एक पुरुष आपल्या पत्नी समवेत बाजारात खरेदीसाठी आली असता त्यांच्या खिशातील १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी लंपास करून पोबारा केला. त्यानंतर लगेचच समर्थ नगर येथील तरुणाचा मोबाईल चोरट्यांनी लांबविला.
सातत्याने रविवारच्या बाजारात मोबाईल चोरी, पाकिट मारी आदी घटना घडत असताना पोलिसांकडे तक्रारी देऊनही काही उपयोग होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.राहूरी फॅक्टरी येथील वाढती गुन्हेगारी कायम चर्चेत येत आहे.शनिवारी भरदिवसा महिलेच्या गळ्यातील गंठण ओरबडण्याचा प्रयत्न तर आज दोन मोबाईल चोरी झाल्याची घटना घडल्याने दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी रोखणार कोण असा प्रश्न सामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे.
मोकळ्या मैदानात बाजार भरावा- कराळे
राहूरी कारखाना कामगार वसाहत येथे दर रविवारी मोठ्या प्रमाणात बाजार भरतो. या बाजारात खरेदीसाठी गर्दी होत असते.परिणामी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. कारखाना कॉलनीत बाजार भरत असल्याने चोरांना पळून जाण्यासाठी अनेक रस्ते आहे.त्यामुळे दर रविवारी भरणारा बाजार मंगल कार्यालय, क्लब हाऊस मैदान आदी मोकळ्या ठिकाणी भरविणे गरजेचा असून सदर ठिकाणी राहूरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी व कारखाना सुरक्षा रक्षक यांनी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करावी अशी मागणी नगरसेवक आदीनाथ कराळे यांनी केली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत