गुटखा व्यापारी-- दुकानदारासह त्या पोलिसांची चौकशी होणार; पोलिस उपअधिक्षक मिटके - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गुटखा व्यापारी-- दुकानदारासह त्या पोलिसांची चौकशी होणार; पोलिस उपअधिक्षक मिटके

  देवळाली प्रवरा प्रतिनिधी    राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील गुटखा विक्रेता व दुकानदार यांच्यावर पोलिसांनी छापा टाकुन मुद्देमालासह दोघांना...

 देवळाली प्रवरा प्रतिनिधी 

  राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील गुटखा विक्रेता व दुकानदार यांच्यावर पोलिसांनी छापा टाकुन मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेतले.परंतू गुन्हा दाखल न करता गुटखा व्यापारी व दुकानदार  आर्थिक तडजोडी अंती सोडून दिल्या प्रकरणी त्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.सखोल चौकशी करुन त्या दोन पोलिसांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी पञकारांशी बोलताना सांगितले.

            राहुरी तालुक्याच्या पुर्वभागात गुटखा पानमसाला तंबाखू सुपारी आदिंची विक्री जोरात सुरु आसल्याची गोपनीय माहीती राहुरी पोलीसांना मिळाली त्यावरुन पोलीस शुक्रवारी सकाळी सात वाजता माहेगाव येथे साध्या गणवेशात येवुन एका किराणा दुकाना समोर दडी धरुन बसले आसता सकाळी आठ वाजता श्रीरामपूर तालुक्यातील एक गुटखा पानसुपारी तंबाखू विक्री करनारा व्यापारी स्कुटी गाडीवरुन आला त्याने गाडीच्या पिशवीतून गुटखा काढुन समोरच्या दुकानदारास देत आसतानाच पोलीसांनी त्याच्यावर धाड टाकली.

             गुटखा विक्रेत्याच्या गाडीवर साधारण लाखभर रुपायाचा पान मसाला व गुटखा होता. तो जप्त करुन,संबधीत व्यापाऱ्यांस  ताब्यात घेतले तसेच खरेदी करणाऱ्या  दुकानदारला ही ताब्यात घेवुन राहुरी पोलिस ठाण्याकडे रवाना झाले. या घटनेची चर्चा काही वेळातच गावात पसरली. काही गावपुढाऱ्यांनी संबधित पोलिसांना भ्रमणभाषवरुन संपर्क करुन महाडुक सेंटर ते मुसळवाडी दरम्यान गाडी थांबण्यास सांगीतले तेथे आम्ही येतो. आपण या घटनेवर चर्चा करुन मार्ग काढु परंतू गुन्हा दाखल करु नका? गावपुढाऱ्यांनी मुसळवाडी येथील एका हाँटेलवर बसुन घडलेल्या घटनेवर चर्चा करुन गुटखा व्यापारी व किराणा दुकानदार यांना सोडण्यासाठी त्या दोन पोलिसांबरोबर दोन लाखाची आर्थिक तडजोड करुन  या दोन्ही व्यापाऱ्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल नकरता सोडुन देण्यात आले.या घटनेचे प्रथमदर्शनींंनी माहिती दिली आहे. दोन्ही व्यापाऱ्यास पोलिसांनी गुटखा विक्री प्रकरणी मोठी तडजोड केली असुन परिसरातील ग्रामस्थांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

              शनिवार दिवसभर या प्रकरणाची सोशल मिडीयावर चर्चा रंगली होती. या प्रकरणाची माहिती माझ्याकडे आली असल्याचे श्रीरामपूर पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी सांगितले.प्राथमिक माहिती घेण्यात आली आहे.त्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.चौकशीत ते पोलीस कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर खात्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल.त्याच प्रमाणे तो गुटखा पुरवठादार व दुकानदार यांची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात येईल.असे पोलिस उपअधिक्षक मिटके यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत