मातंग समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक घेऊ- ना.भुजबळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मातंग समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक घेऊ- ना.भुजबळ

  कोपरगाव(वेबटीम) मातंग समाजाच्या  शैक्षणिक,सामाजिक व आर्थिक प्रश्न सोडवण्या साठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत बैठक लावू असे आ...

 कोपरगाव(वेबटीम)

मातंग समाजाच्या  शैक्षणिक,सामाजिक व आर्थिक प्रश्न सोडवण्या साठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत बैठक लावू असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी दिले .


लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष मा रामचंद्र भरांडे व प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची येवला येथे भेट घेतली असता लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने ना भुजबळ यांना मातंग समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात मातंग समाजाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक सामाजिक,आर्थिक विकास व्हावा या साठी स्वतंत्र आरक्षनाची मागणी होत आहे मा सर्वोच्च न्यायालय अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे लोक संख्येच्या प्रमाणात वर्गीकरण व्हावे या साठी राज्यांनी निर्णय घ्यावा या बाबत अनुकूल असल्याचे मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देण्यात आले, बार्टी प्रमाणे आर्टीची स्थापना करण्यात येऊन मातंग तरुणांना प्रशासकीय सेवेत संधी मिळावी व मातंग समाजातील तरुणांना सनदी अधिकारी होता यावे या साठी प्रयत्न व्हावे.

साहित्य रत्न लोक शाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाला एक हजार कोटी रुपये भांडवल देण्यात येऊन मातंग समाजाचा आर्थिक विकासासाठी ठोस कृती कार्यक्रम आखावा, तसेच अण्णा भाऊ साठे यांच्या सुवर्ण मोहत्सवी जयंतीनिमित्त जागतिक दर्जाचे स्मारक व क्रांतिगुरु लहुजी स्मारक उभारणी साठी निधी उपलब्ध करून घ्यावा या मागण्या  निवेदनाद्वारे करण्यात आल्या यावर चर्चा करून लवकरच समाजातील  विविध  संघटनांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत बैठक बोलावू असे आश्वासन छगन भुजबळ यांनी लोक स्वराज्य आंदोलनाच्या  शिष्ट मंडळाला दिले.

या वेळी कैलास सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी गोविंद परतवाड आदी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत