रावसाहेब रोहोकलेंच्या संवेदनशीलतेमुळे मिळाली अपघातग्रस्त महिलेला तातडीची वैद्यकिय मदत* - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

रावसाहेब रोहोकलेंच्या संवेदनशीलतेमुळे मिळाली अपघातग्रस्त महिलेला तातडीची वैद्यकिय मदत*

अहमदनगर (प्रतिनिधी) - अहमदनगर जिल्ह्यतील सर्वसामान्य शिक्षकांच्या सुख दु:खात सातत्याने सहभागी होणा-या रावसाहेब रोहोकलेगुरूजी यांच्या संवेदनश...


अहमदनगर (प्रतिनिधी) -


अहमदनगर जिल्ह्यतील सर्वसामान्य शिक्षकांच्या सुख दु:खात सातत्याने सहभागी होणा-या रावसाहेब रोहोकलेगुरूजी यांच्या संवेदनशील स्वभावाचा   अनुभव त्यांच्या समवेत उपस्थित कार्यकर्त्यांना नुकताच नगरमध्ये आला. 


 प्रसंग होता शिक्षक परिषदेचे जिल्हा सहकार्यवाह  सुनिल पवळे सरांच्या मुलीच्या  दुकानाच्या उदघाटनास उपस्थित राहण्याकरिता रोहोकले गुरूजी काही कार्यकर्त्या समवेत जात असतानाचा.   

    सायंकाळचे ७ वाजलेले होते.मँक्स केअर हॉस्पीटलपुढे रस्त्यावर लोकांची मोठी गर्दी दिसत होती. समोरच एका मोटारसायकलचा अपघात झालेला दिसला. अपघातात वयोवृध्द महिला व तरूण  दोघेही रस्त्यावर पडलेले दिसत होते. बघ्यांची गर्दी झालेली होती. परंतू कोणीही मदत करायला पुढे येत नव्हते. रोहकले गुरूजींना हे दिसताच त्यांनी तत्काळ गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. आपल्यासमवेत असलेल्या विकास डावखरेसरांच्या मदतीने अपघात ग्रस्त महिलेला  उचलून घेऊन  दवाखाण्यात दाखल केले. स्वत: हॉस्पिटलमधील संबंधित डॉक्टराशी संपर्क करत तातडीने वैद्यकिय मदत मिळवून दिली. त्या दोघांवरही पुढील उपचार सुरू 

झाल्याची खात्री पटल्यानंतरच गुरूजी कार्यक्रमाकडे रवाना झाले.गुरूजींच्या संवेदनशील भावुक स्वभावामुळेच अपघातग्रस्तांना लागलीच मदत मिळाल्याचे समाधान  उपस्थित कार्यकर्त्याच्या चेह-यावर जाणवत होते.

 त्यामुळेच त्यांच्या समवेत असलेल्या रोहोकलेप्रणित गुरमाऊली मंडळाचे अध्यक्ष असलेल्या विकास डावखरे यांनी आम्हाला रोहोकलेगुरुजींचे कार्यकर्ते असल्याचा अभिमान निश्चितपणे नेहमीच वाटतो अशी प्रतिक्रीया यावेळी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत