आ.लहू कानडे यांच्या वक्तव्याचा देवळाली प्रवरात निषेध - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आ.लहू कानडे यांच्या वक्तव्याचा देवळाली प्रवरात निषेध

  देवळाली प्रवरा(वेबटीम) गेल्या दोन दिवसांपूर्वी  देवळाली प्रवरा येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात आ.लहु कानडे यांनी राम मंदिर वर्गणी...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)

गेल्या दोन दिवसांपूर्वी  देवळाली प्रवरा येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात आ.लहु कानडे यांनी राम मंदिर वर्गणीच्या नावाखाली भाजपाचे काही पुढारी खंडणी गोळा करत असल्याचे वक्तव्य केल्याने आज देवळाली प्रवरा शहरात राम भक्तांच्यावतीने आ.कानडे यांचा निषेध करून त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

        देवळाली प्रवरा येथील शेतकरी पुतळा येथे श्रीराम भक्तांनी एकत्रित येऊन आ.लहू कानडे यांचा निषेध केला तर नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनी आ. कानडे यांच्यावर पोलीस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

           तर माजी उपनगराध्यक्ष अनंत कदम यांनी सांगितले की देवळाली प्रवरात दरवर्षी  साईचरीञ पारायण व किर्तन महोत्सव आयोजित केला जातो .या कार्यक्रमात जेवणाच्या पंगती दिल्या जातात.आ.लहू कानडे यांच्याकडे मागणी नकरता त्यांनी पंगत दिली परंतू पंगतीसाठी आलेला खर्च 23 हजार रुपये दिले नाहीत. शेवटी साई प्रतिष्ठाणला पंगतीच्या किराण्याची बाकी भरावी लागली. कानडेच धार्मिक  वर्गणी बुडवतात त्यांना राम मंदिराच्या वर्गणीवर बोलण्याचा अधिकार नाही.

           नगराध्यक्ष सत्यजित कदम,नगरसेवक आण्णासाहेब चोथे, सचिन ढुस, संजय बर्डे,माजी नगराध्यक्ष जगन्नाथ चव्हाण,गोरख मुसमाडे माजी उपनगराध्यक्ष अशोक शेटे, अनंत कदम, सोपान शेटे, शहाजी कदम, भारत शेटे, सोपान भांड,दिलीप मुसमाडे ,राजेंद्र ढुस ,सुधीर टिक्कल,संदिप कदम,दिगंबर पंडीत ,सुखदेव होले,रविंद्र ढुस ,डाँ.संदिप मुसमाडे, कारसेवक दिपक सिनारे यांच्या हस्ते पोलिसांना निवेदन  देण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत