छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमांना परवानगी द्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमांना परवानगी द्या

  राहूरी(वेबटीम) कोरोनामुळे शासनाकडून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असला तरी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांना परव...

 राहूरी(वेबटीम)

कोरोनामुळे शासनाकडून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असला तरी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी द्या अशी मागणी आज दिनांक ८ फेब्रुवारी रोजी राहूरी येथील शिवजयंती उत्सव समिती, मराठा एकीकरण समिती व छावा संघटनेने  प्रांताधिकारी श्री. जगताप व  तहसीलदार श्री. शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हंटले आहे कि, सालाबादा प्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत “छत्रपती शिवाजी महाराज” यांची जयंती निमित्त “१९ फेब्रुवारी २०२१” रोजी पालखी मिरवणूक व लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याच्या विचारधीन आहोत.


 परंतु कोरोंना रोगाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या वतीने जमाव बंदीचे आदेश दिलेले आहेत असे समजते.सध्या कोरोंना रोग नियंत्रणात आल्याचे निदर्शनात येत आहे.तसेच मोठ्या प्रमाणावर सामाजिक व राजकीय पक्षांच्या नेत्यांचे कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी घेतले गेले/जात आहेत.

त्या कारणाने मा.मुख्यमंत्री साहेब यांनी  शिवशंभू प्रेमीच्या भावना लक्षात घेऊन “छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या जयंती निमित्त होणार्‍या कार्यक्रमांना परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली.

या प्रसंगी मराठा बहुऊद्देशिय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा अ.भा.छावाचे जिल्हाकार्याध्यक्ष देवेंद्र लांबे पाटील म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती करण्यासाठी सरकारने रितसर परवानगी द्यावी.शिवप्रेमींच्या भावनेचा सहानुभूती पूर्वक विचार करावा.राजकीय पक्षांचे कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवून घेतले जातात.यावेळी कुठलेही शासकीय यंत्रणा नियमांनवर बोट ठेवत नाही.फक्त सर्वसामान्य जनतेलाच काही सामाजिक उपक्रम घ्यायचे आसल्यास नियम दाखवून कायद्याचा धाक दाखविला जातो.सरकारने वेळीच येणाऱ्या १९ फेब्रुवारी २१ ला होणाऱ्या शिवजयंती उत्सवला रितसर परवानगी द्यावी.अन्यथा सरकारला शिवजयंती उत्सव समिती,मराठा एकीकरण समिती ,अखिल भारतीय छावा संघटना व शिवशंभु प्रेमिंच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

या प्रसंगी शिवश्री देवेंद्र लांबे पा.,मराठा एकीकरण समितीचे कायदेशीर सल्लागार ॲड.तुषार भुजाडी पा,,अॕड.अमोल डौले पा.,उपाध्यक्ष राजेंद्र लबडे पा.,महेंद्र शेळके पा.,दिनेश झावरे पा.,सोमेश्वर गाडे पा.,अविनाश क्षिरसागर पा. आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत