आपत्ती व्यवस्थापन समन्वयक कोविड योध्दा सुशांत घोडके यांना कोरोना प्रतिबंध लस - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आपत्ती व्यवस्थापन समन्वयक कोविड योध्दा सुशांत घोडके यांना कोरोना प्रतिबंध लस

  कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव तालुक्यात कोरोणा संकटकाळात सर्वसामान्य जनतेच्या ३०० दिवसांपेक्षा अधिक काळ अहोरात्र जनसेवेत नि:स्वार्थ तत्पर असलेले...

 कोपरगाव(वेबटीम)

कोपरगाव तालुक्यात कोरोणा संकटकाळात सर्वसामान्य जनतेच्या ३०० दिवसांपेक्षा अधिक काळ अहोरात्र जनसेवेत नि:स्वार्थ तत्पर असलेले आपत्ती व्यवस्थापन समन्वयक कोविड योध्दा श्री.सुशांत घोडके सर यांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात आली आहे.

गुरु शुक्राचार्य,साधू-संत,माजी सैनिक कै.अप्पा घोडके यांचे नामस्मरण करत...छत्रपती शिवाजीराजे महाराज यांची श्रीमंतयोगी छबी असलेला शर्ट परिधान करून...हाती राष्ट्रध्वज तिरंगा घेवून सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके सर सहकारी समवेत ग्रामिण रुग्णालय येथील लसीकरण केंद्रावर सहकारी समवेत दाखल झाले होते.


ग्रामिण रुग्णालयाच्या आरोग्य सेविका सपना पठारे, तसलिम सय्यद यांनी त्यांना लस दिली.या प्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर,डॉ.विजय क्षीरसागर, डॉ.जितेंद्र रणदिवे,साथ नियंत्रण अधिकारी सचिन जोशी,प्रा.अतुल कोताडे, बंडोबा चिचपुरे,दिपक शिंदे,अनंत गोडसे,अमित खोकले, गणेश कानडे, मुकुल अहिरे,ईस्माईल पटेल,कुणाल राका उपस्थित होते.

याप्रसंगी लसीकरण केंद्रावर सेवा देणारे उपस्थित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना गुलाबपुष्प देवून सन्मान केला.लस घेतल्यावर हातात भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा हाती घेवून छत्रपती शिवाजी महाराज कि जय,भारत माता की जय, वंदेमातरम् जय घोष केला.

लस घेतल्यावर समन्वयक सुशांत घोडके म्हणाले, पुढील काळात सर्वसामान्य जनतेलाही लस मिळेल.लस घेतली तरी मास्क वापरणे प्रत्येकाने अनिवार्य आहे.लस पुर्ण सुरक्षित असून नागरिकांनी जोपर्यंत संपूर्ण भारतीयांना लस दिली जात नाही तोपर्यंत प्रत्येकाने सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क वापरणे, काही खाणे-पिणे अगोदर हात वेळोवेळी नियमित स्वच्छ धुवावेत.असे आवाहन शेवटी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत