देवळाली प्रवरात शनिवारी तुकडेबंदी बाबत बैठक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात शनिवारी तुकडेबंदी बाबत बैठक

देवळाली प्रवरा(वेबटीम)  महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्ष समन्वय समिती चे वतीने देवळाली प्रवरा येथे तुकडेबंदी बाबत बैठकीचे आयोजन करणेत आले अ...

देवळाली प्रवरा(वेबटीम)


 महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्ष समन्वय समिती चे वतीने देवळाली प्रवरा येथे तुकडेबंदी बाबत बैठकीचे आयोजन करणेत आले असून ज्या नागरिकांना तहसील कार्यालयाकडून वसुलीच्या नोटिसा प्राप्त झालेल्या आहेत त्यांनी शनिवार दि. ०६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १०:०० वाजता देवळाली प्रवरा श्रीरामपूर रस्त्यावरील सहारा मंगलकार्यालय येथे बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने आप्पासाहेब ढुस यांनी केले आहे. 

      राहुरी अर्बन निधी संस्थेच्या कार्यालयात आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेणेत आला. या बैठकीला समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, उपाध्यक्ष डॉ विलास पाटील, खजिनदार रामभाऊ काळे, सचिव किशोर थोरात, सदस्य विष्णुपंत गीते, सुभाष घोरपडे, मारुती मोरे, प्रशांत काळे आदींसह बहुसंख्य सदस्य हजर होते.  

      याबद्दल माहिती देताना ढुस पुढे म्हणाले की,  महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्याचे एकत्रीकरण करणे बाबत अधिनियम १९१७ अन्वये नागरिकांना महसूल प्रशासनाकडून मालमत्तेच्या बाजार मूल्याच्या २५%  रक्कम भरणा करणेसाठी तहसील कार्यालयामार्फत वसुलीच्या नोटिसा बजावल्या आहेत. केवळ देवळाली प्रवरा हद्दीत जवळपास दीड कोटी रुपयांचा वसूल केला जाणार असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. ही वसुली केवळ देवळाली प्रवरा पुरती मर्यादित नसून राज्यातील बहुसंख्य भागात ही वसुली सुरू झाली आहे.  त्याबद्दल चर्चा विनिमय करून पुढील दिशा ठरविणेसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  गत वर्षी ज्या पद्धतीने या विषयावर चर्चा करून मार्ग काढला, त्याच पद्धतीने या विषयावर कायमचा तोडगा काढण्यासाठी ज्या नागरिकांना महसूल विभागाने वसुलीच्या नोटिसा आल्या आहेत त्या सर्व नागरिकांनी या बैठकीस हजर राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्ष समन्वय समितीने केले आहे.  

      महसूल विभागाच्या तहसील कार्यालयाकडून प्राप्त वसुली बाबत नोटीस वर चर्चा विनिमय, समितीचा गत वर्षीच्या कामाचा आढावा, जिल्हा समितीवर पदाधिकारी निवड, समितीवर नवीन सदस्य निवड अश्या विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करून पुढील दिशा ठरविली जाईल. असे आप्पासाहेब ढुस यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत