कोपरगाव(वेबटीम) उपेक्षित व वंचीत घटकांचे प्रश्न व समस्या सारख्या असून त्या सोडवायच्या असतील तर उपेक्षित घटकांनी एकत्र येऊन लढा उभा करणे गरजे...
कोपरगाव(वेबटीम)
उपेक्षित व वंचीत घटकांचे प्रश्न व समस्या सारख्या असून त्या सोडवायच्या असतील तर उपेक्षित घटकांनी एकत्र येऊन लढा उभा करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक प्रा.रामचंद्र भरांडे यांनी व्यक्त केले.
प्रा भरांडे यांनी नुकतीच कोपरगाव येथे भेट दिली. त्यावेळी विविध समाज संघटना व त्यांचे नेते यांनी प्रा. भरांडे यांची भेट घेतली. त्या वेळी बोलताना प्रा भरांडे म्हणाले की, उपेक्षित व वंचित घटकांचे प्रश्न व समस्या समान आहेत मात्र आपण वेगवेगळे लढून आपल्या समस्या वर्षानुवर्षे तशाच आहेत आजही अनेक समाज संघटना व नेत्यांना आपल्या समाजाच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी निवेदन, आंदोलन, मोर्चे उभे करावे लागत आहेत.
अनुसूचित जाती मधील अनेक उपजातींना आरक्षणाचा लाभ होत नाही त्यामुळे या उपेक्षित जातीना एकत्र आणून अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण व्हावे या साठी दहा लाख सह्यांची मोहीम उभारली आहे.
आपल्या समस्या या सारख्या असून त्या सोडवण्या साठी उपेक्षित घटकांनी किमान समान कार्यक्रम राबवून एकत्र लढा उभारणे गरजेचे आहे.
या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुनील फंड,अनिल गायकवाड, लोक स्वराज्य आंदोलनाचे अँड.नितीन पोळ सोमनाथ म्हस्के , सुजल चंदनशिव , घटनाकार मैत्री संघाचे नितीन बनसोडे,शिवसेनेचे युवा नेते व मेहतर समाजाचे गगन हाडा,मुस्लिम समाजाचे लियाकत सय्यद, खालिद कुरेशी रवी शेलार ,लक्ष्मण साबळे आदी मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते





कोणत्याही टिप्पण्या नाहीत