राहूरी एसव्ही ग्रुपच्या महिला सुविधा केंद्राचे उदघाटन संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी एसव्ही ग्रुपच्या महिला सुविधा केंद्राचे उदघाटन संपन्न

राहूरी(वेबटीम)  राहूरी शहरात एस व्ही ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या शासकीय मान्यताप्राप्त  महिला सुविधा केंद्राचा शुभारंभ दिनांक ...

राहूरी(वेबटीम)

 राहूरी शहरात एस व्ही ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या शासकीय मान्यताप्राप्त  महिला सुविधा केंद्राचा शुभारंभ दिनांक ५ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.

 या महिला सुविधा केंद्राचे उदघाटन पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य तथा माजी नगराध्यक्ष डॉ.उषाताई तनपुरे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,विद्यमान नगराध्यक्षा अनिताताई पोपळघट ,तालुका कुषी अधिकारी महेंद्र ठोकळे,शिव प्रतिष्ठाणचे संस्थापक पवार साहेब ,शिव शाहीर विजय तनपुरे, राष्ट्रीय चर्मकार संघटनाचे प्रदेश अध्यक्ष दिलीप कानडे, जिल्हा अध्यक्ष अशोक कानडे ,न्यायाधीश हर्षदा आदमाने आदी उपस्थित होते.

या महिला सुविधा केंद्रा मार्फत अंध, अपंग, परितक्त्या महिलांना अर्थ सहाय्य, बचत गट स्थापना, विविध योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच कौटुंबिक समुपदेशन, अन्याय, अत्याचार न्याय समुपदेशन, महिला व युवतीना विविध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम, अत्याचारीत, पिढीत महिला तसेच युवक व वृद्धांना कायदेशीर सल्ला आदींसह विविध उपक्रम राबविले जाणार आहे.

  या कार्यक्रमास डॉ. सुचेता कुलकर्णी, लता कांबळे, शिरसागर मॅडम, सौ.गोरे ताई, सौ सुरेखाताई देवरे, सौ अलका सोनवणे, सौ योजना लोखंडे, सौ रजनी धमाळ , वैशाली नहार,  मोरे ताई, तसेच राहुरी अर्बन निधीचे चेअरमन रामभाऊ काळे, मारुती मोरे, अप्पासाहेब ढुस मान्यवर उपस्थित होते. डॉ. प्रकाश पवार यांच्या शिव प्रतिष्ठान, देसवंडीचे याकामी सौजन्यकामी सहकार्य लाभले.

  कार्यक्रम यशस्वीतेसाठी  एस व्ही ग्रुप,  सरस्वती प्रतिष्ठाण व विद्या निकेतन अध्यक्ष श्रीमती मनिषाताई पोटे, श्रीमती विद्याताई शिरसागर, वर्षाताई गागरे श्री. पाठक सर यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत