वळण (प्रतिनिधी) राहुरी तालुक्यात सहकारी सेवा संस्था क्षेत्रात. अग्रगण्य असलेल्या पूर्व भागातील वळण विविध विकास सेवा संस्थेच्या ,अध्यक्ष...
वळण (प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यात सहकारी सेवा संस्था क्षेत्रात. अग्रगण्य असलेल्या पूर्व भागातील वळण विविध विकास सेवा संस्थेच्या ,अध्यक्षपदी दादासाहेब गोरक्षनाथ कुलट ,यांची तर उपाध्यक्षपदी काकासाहेब उत्तमराव आढाव यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
सोमवारी सकाळी सोसायटीच्या सभागृहात झालेल्या निवड प्रसंगी, राहुरीचे सहाय्यक निबंधक दीपक नागरगोजे हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. अध्यक्षपदासाठी कुलट यांच्या नावाची सूचना ज्ञानेश्वर खुळे यांनी मांडली ,त्यास सर्जेराव आढाव यांनी अनुमोदन दिले .तर उपाध्यक्षपदासाठी आढाव यांच्या नावाची सूचना बाळासाहेब खुळे यांनी मांडली. त्यास मुकिंदा काळे यांनी अनुमोदन दिले. या निवड प्रसंगी संचालक गणेश कारले, बाबासाहेब आढाव , सारंगधर फुणगे, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रय खुळे, उपसरपंच एकनाथ खुळे ,ज्ञानेश्वर खुळे ,बाळासाहेब खुळे,अशोक कुलट,बी आर खुळे, विलास आढाव ,अशोक काळे आदी उपस्थित होते .निवडणूक अधिकारी नागरगोजे यांना संस्थेचे सचिव विजय शेळके, सहाय्यक सचिव श्यामूभाई पठाण, फकीरचंद फुणगे ,राजू कारले, यांनी सहाय्य केले.
निवडीनंतर मावळते अध्यक्ष ,उपाध्यक्ष तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना कुलट व आढाव म्हणाले की यापूर्वी ज्या पद्धतीने सर्व संचालकांना विश्वासात घेऊन, नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज सभासदांच्या हिताचे करण्यात आले .तसेच यापुढेही आम्ही कामकाज करु .व येत्या दिवाळीला सभासदांना योग्य डिव्हिडंड देण्यासाठी प्रयत्न करू, असा शब्द दिला. दत्तात्रय खुळे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, यापुढे प्रत्येक व्यक्तीने चांगले काम केले तरच. निवडणुकीला सामोरे जाताना अडचण येणार नाही .येत नाही भविष्यात कोण कामाचा? कोण हिताचा? हेच पाहिले जाणार असल्याने सर्वांनी एक दिलाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. संचालक मुकिंदा काळे यांनी आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत