राहूरी फॅक्टरी येथे वाढती गुन्हेगारी, रास्ता रोको आंदोलनाचा इशारा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी फॅक्टरी येथे वाढती गुन्हेगारी, रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे होत असलेल्या गुन्ह्यांचा पोलीस प्रशासनाने तातडीने तपास लावून कारवाई करावी तसेच परिस...

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम)

तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे होत असलेल्या गुन्ह्यांचा पोलीस प्रशासनाने तातडीने तपास लावून कारवाई करावी तसेच परिसरात होत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राहुरी फॅक्टरी येथील विविध मित्र मंडळ संघटना व  परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

        याबाबत श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून सामान्य माणसांमध्ये त्यामुळे भीती निर्माण झालेली आहे. परिसरात रस्ता लूट हा प्रकार नित्याचा झालेला आहे त्याचबरोबर परिसरातील व्यापाऱ्यांना दमबाजी करून त्यांच्याकडून काही नंगट व्यक्ती हप्ते वसुली करत आहेत व दमबाजी करत आहेत त्याचबरोबर नुकतेच परिसरातील एका शालेय विद्यार्थिनीचा अपहरणाचा प्रकार देखील समोर आलेला आहे. परिसरातील अनेक नागरिकांचे मोबाईल चोरीस गेलेले असून मुलांचा शालेय विद्यार्थिनी व सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट झालेला आहे काही चौकांमध्ये गुंडांचे अड्डे बनवले गेले आहेत यावर पोलिस प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा वचक राहिलेला नाही. आजूबाजूचे गावचे काही गुंड प्रवृत्तीचे लोक राहुरी फॅक्टरी येथे येऊन आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत आम्ही राहुरी पोलीस स्टेशन व संबंधित अधिकारी यांना वेळोवेळी कल्पना दिलेली  असतानाही त्यांच्या नाकर्तेपणामुळे आम्हाला अखेर आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे.

 या गुन्हेगारांवर तातडीने वचक बसून संबंधित गुन्ह्यांचा तपास आठ दिवसांच्या आत न लागल्यास आमच्या मंडळाच्यावतीने व परिसरातील नागरिकांच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथील  श्रीरामपूर नाका ताहाराबाद चौक येथे दिनांक १० फेब्रुवारी २०२१ रोजी रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. आम्ही या निवेदनाद्वारे आपणास विनंती करतो की संबंधित अधिकाऱ्यांना आपण सूचना करून या गुन्ह्यांचा तपास लावण्या संदर्भामध्ये सूचना कराव्यात अन्यथा रास्ता रोको आंदोलना सारख्या घेतल्या गेलेल्या आंदोलनास सर्वस्वी पोलीस प्रशासनास जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. या निवेदनाची प्रत  जिल्हाधिकारी अहमदनगर,  पोलीस अधीक्षक अहमदनगर, तहसीलदार राहुरी,  पोलीस निरीक्षक राहुरी आदिंना देण्यात आलेली आहे. निवेदनावर शांती चौक मित्र मंडळ अध्यक्षदीपक त्रिभुवन , व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विष्णूपंत गीते राजे छत्रपती मित्र मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक प्रदीप गरड , शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश लोखंडे , वैष्णवी चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष वसंतराव कदम ,अंबिका नगर मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रशांत काळे आदींच्या सह विविध संघटनांचे पदाधिकारी नागरिक यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.




    

                        


 




 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत