स्थानिक स्वराज्य संस्था राजकीय लोकांनी पोरखेळ केल्या- अँड. नितीन पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

स्थानिक स्वराज्य संस्था राजकीय लोकांनी पोरखेळ केल्या- अँड. नितीन पोळ

  कोपरगाव(वेबटीम) स्थानिक स्वराज्य संस्था या नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी निर्माण केल्या असल्या तरी सध्या तरी स्थानिक स्वराज्य संस्था...

 कोपरगाव(वेबटीम)

स्थानिक स्वराज्य संस्था या नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी निर्माण केल्या असल्या तरी सध्या तरी स्थानिक स्वराज्य संस्था राजकीय लोकांनी पोरखेळ केला असल्याची खंत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की,भारतीय राज्य घटनेत नागरी समस्याची सोडवणूक करण्यासाठी नगर पालिका,पंचायत समिती,जिल्हा परिषद यांची निर्मिती केली या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून नागरी समाश्या सोडवणूक करणे हा उदात्त हेतू होता मात्र सध्या तरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे  राजकीय लोकांनी आपल्या मुलांना राजकीय धडे देण्याचे व्यासपीठ केले असून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यापेक्षा अडवणूक करण्यासाठी या संस्थाचा उपयोग केला जात आहे.

महाराष्ट्रात ज्या प्रमाणे या संस्था राजकीय लोकांच्या पोरांना राजकीय धडे देण्यासाठी वापरल्या जात आहेत कोपरगाव तालुका देखील याला अपवाद नसून माजी मंत्री कै शंकरराव काळे साहेब,माजी खा.कै सूर्यभान पाटील वहाडने माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांनी तालुका व शहराच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी याच स्थानिक स्वराज्य संस्था मधून आपल्या राजकीय  कारकीर्तीला सुरुवात केली व राज्यात आदर्श निर्माण केला.मात्र आता याच प्रस्थापित नेत्यांची दुसरी तिसरी पिढी या स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये राजकारणाचे धडे शिकत असून दुर्दैवाने  जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यापेक्षा अडवणूक करण्यावर भर दिला जात आहे श्रेय वादाच्या राजकारणात अनेक विकास कामांना खीळ बसत असून जनतेच्या मूलभूत गरजा असलेल्या पिण्याचे, शेतीचे पाणी, रस्ते, याकडे दुर्लक्ष होत आहे या संसतेच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक होण्याऐवजी अडवणूक होत आहे .

आपल्या पुढच्या पिढीच्या राजकीय वाटचालीत जनतेचा मात्र हकनाक बळी जात असून  स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे राजकीय लोकांनी पोर खेळ करून टाकल्या आहेत असे दिसते मात्र पद प्रतिष्ठा आणि पैशाच्या जोरावर जनतेचा आवाज दाबला असला जात असला तरी मागील नगर पालिका निवडणुकीत जनतेने अपक्ष नगराध्यक्ष निवडून देऊन मत पेटीतून आपला राजकीय उद्रेक दाखवुन दिला .

मात्र राजकीय वारसा लाभलेले नगराध्यक्ष निवडून गेल्याने जनतेचा भ्रम निराश झाला मात्र आगामी नगर पालिका निवडणुकीत जनतेने ठरवले तर सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे व राजकीय वारसा नसलेले स्वतंत्र विचार व जनतेच्या प्रशांची जाण असणारे लोक निवडून दिले तर आश्वासक चित्र राहील अशी अपेक्षा व्यक्त केली असून राजकीय लोकांनी आपल्या पोरांकरता उभा केलेला पोर खेळ थांबविण्याचे आवाहन या पत्रकातून केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत