कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव येथील विविध संघटनांच्या मागणीचा विचार करून डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानाचे काम जलद व उत्कृष्ट करून नगरपालिकेने कोपरगाव...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव येथील विविध संघटनांच्या मागणीचा विचार करून डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानाचे काम जलद व उत्कृष्ट करून नगरपालिकेने कोपरगाव शहराच्या वैभवात भर घातली असे गौरवोद्गार लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की, कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती आणि मोक्याच्या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पाठीमागे असलेल्या मैदानास डॉ आंबेडकर मैदान असे नामकरण केले होते .मात्र यापूर्वी शेजारील रस्त्याचे काँक्रीटीकरण केल्यमुळे या मैदानाची अत्यंत दुरवस्था झाली होती.या ठिकाणी पावसाळ्यात चिखल होत होता त्याच प्रमाणे खड्डे पडले होते.
या मैदानावर आता पर्यंत अनेक दिग्गज राजकीय नेते यांच्या सभा संपन्न झाल्या आहेत त्याच प्रमाणे अनेक संस्कृतीक कार्यक्रम या मैदानावर होत असतात त्यामुळे अनेक सामाजिक संघटनांनी या मैदानाची दुरुस्ती व्हावी अशी मागणी केली होती.
मात्र नगराध्यक्ष विजयराव वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे तातडीने निर्णय घेऊन या मैदानाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले एवढेच नव्हे तर अत्यंत कमी वेळात व उत्कृष्ट रित्या हे काम पूर्ण केले असून या कामाचे लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने स्वागत करण्यात येत असून डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानाचे काँक्रेटिकरण शहराच्या वैभवात भर टाकणारे आहे तसेच कोपरगाव शहरातील विविध प्रकारचे रस्ते गटारी यांचे काम देखील असेच उत्कृष्ट व्हावे असा आशावाद व्यक्त केला.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत