देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षांवर अंबिकानगर येथील नागरीकांकडून प्रश्नाचा भडीमार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षांवर अंबिकानगर येथील नागरीकांकडून प्रश्नाचा भडीमार

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) आगामी काळात देवळाली  प्रवरा नगरपालिकेची निवडणूक होत असून त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे प्रभाग निहाय...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)

आगामी काळात देवळाली  प्रवरा नगरपालिकेची निवडणूक होत असून त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे प्रभाग निहाय बैठक घेवून नागरीकांशी संवाद साधण्याच्या पहिल्याच बैठकीत राहूरी फॅक्टरी येथील अंबिकानगर येथील नागरीकांनी नगराध्यक्ष  सत्यजित कदम यांच्यावर नागरी समस्यांवरून भडीमार केला. जनतेशी संवाद साधण्यासाठी कार्यकर्त्याच्या आग्रहावरून आयोजित केलेली ही बैठक नगराध्यक्ष कदम यांच्या अंगलट आल्याची चर्चा राहूरी फॅक्टरी परिसरात सूरु आहे.

         राहुरी फँक्टरी भागातील आंबिकानगर भागात दिनांक ७ फेब्रुवारी रोजी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव  नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या उपस्थितीत बैठक बोलविण्यात आली. परंतू या बैठकीत येथील महिला रहिवाशी तसेच तरुणांनी नागरी समस्या मांडायला सुरुवात केल्याने.निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेली बैठक नगराध्यक्षांसह कार्यकर्त्यांच्या अंगलट आली.या बैठकीत नाईलाजाने  नागरिकांच्या समस्यां ऐकुन घेत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता नाकीनळ आली. 

विशेषतः महिला व काही तरुणांनी संधीचे सोने करत विविध समस्यांवरून प्रश्नांची सरबत्ती करत नगराध्यक्षांना जाब विचारला. साडेचार वर्षात पहिल्यांदा विचारायला आल्याचे अनेकांनी बोलून दाखविले. रस्ते, नाली दुरुस्ती व स्वच्छता आदी बाबत नगरपालिका सुविधा पुरवीत नसल्याने नगराध्यक्ष कदम यांना येथील नागरीकांनी धारेवर धरले. 

यावेळी नगराध्यक्ष कदम यांच्या समवेत नगरसेवक आण्णासाहेब चोथे, एकनाथ बनकर व काही प्रमुख कार्यकर्ते आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत