राहुरीत ना.प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत ना.प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन

राहूरी(वेबटीम)     शेतकऱ्यांकडून कृषी पंपाची सक्तीने होणारी वीज बिल वसुली थांबवावी या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भारतीय ज...

राहूरी(वेबटीम)

    शेतकऱ्यांकडून कृषी पंपाची सक्तीने होणारी वीज बिल वसुली थांबवावी या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भारतीय जनसंसद संघटना  यांच्यावतीने सोमवार २२ फेब्रुवारी रोजी राहूरी येथे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे प्रमुख अशोक सब्बन यांनी दिली.

कृषी पंपाची वीज बिल वसुली करण्यासाठी काही ठिकाणी डीपी बंद केल्याच्याही तक्रारी येत आहेत. घरगुती वीज बिल वसुलीसोबतच कृषी पंपांच्या वीज बिल वसुलीचा प्रश्नही सध्या पेटत असून या पार्श्वभूमीवर हजारे प्रणित भारतीय जनसंसद या संघटनेने आंदोलन पुकारले असल्याचे संघटनेचे प्रमुख अशोक सब्बन यांनी सांगितले. सोमवार दि २२ फेब्रुवारीला उर्जा राज्यमंत्री तनपुरे यांच्या राहुरीतील कार्यालयासमोर धरणे धरण्यात येणार आहे.सक्तीने होणारी कृषी पंपाची वीज बिल वसुली थांबवावी यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे.

दरम्यान ना. तनपुरे यांनी पोलीस बंदोबस्तात शेतीविषयक वीजबिल वसुलीबाबत आपण कुठलेही वक्त्यव्य केले नसल्याचे स्पष्ट करून नगर शहरातील तेलीखुंट वीज कार्यालयातील कर्मचाऱ्यावर एका गुंडाने हल्ला केला होता. त्यावेळी मी तेथे गेलो असता वीज बिल वसुलीसाठी गेल्यावरही असे हल्ले होतात, त्यामुळे पोलिस संरक्षण देणार का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी त्यांना केला होता. त्यावर यासंबंधी आपण पोलिस अधीक्षकांशी बोलणार असल्याचे मी म्हणाला होतो असा खुलासा ना.तनपुरे यांनी केला होता. भाजपने आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावून बदनामी सुरू केल्याचे स्पष्टीकरण तनपुरे यांनी दिले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत