देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील माहेगाव येथे गुटखा विक्री करणारा व्यापारी साध्या गणवेशात असलेल्या राहुरी पोली...
देवळाली प्रवरा (प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील माहेगाव येथे गुटखा विक्री करणारा व्यापारी साध्या गणवेशात असलेल्या राहुरी पोलीसांच्या जाळ्यात अडकला शुक्रवारी सकाळी सात वाजता हि घटना घडली. परंतू पोलिस ठाण्यात याबाबत कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे ठाणे अंमलदाराकडून समजते. त्या दोन पोलीसांनी दोन लाखाची आर्थिक तडजोड करुन गुटखा व्यापाऱ्यास सोडून दिल्याची चर्चा सुरु आहे.माहेगाव येथील सामाजिक संघटना जिल्हा पोलिस अधिक्षक यांची भेट घेवून लेखी निवेदनाद्वारे या घटनेची चौकशीची मागणी करणार आहे.
त्या व्यापाऱ्याच्या गाडीवर साधारण लाखभर रुपायाचा पान मसाला व गुटखा होता. तो जप्त करुन,संबधीत व्यापाऱ्यांस ताब्यात घेतले तसेच खरेदी करणाऱ्या दुकानदारला ही ताब्यात घेवुन राहुरी पोलिस ठाण्याकडे रवाना झाले. या घटनेची चर्चा काही वेळातच गावात पसरली. काही गावपुढाऱ्यांनी संबधित पोलिसांना भ्रमणभाषवरुन संपर्क करुन महाडुक सेंटर ते मुसळवाडी दरम्यान गाडी थांबण्यास सांगीतले तेथे आम्ही येतो. आपण या घटनेवर चर्चा करुन मार्ग काढु परंतू गुन्हा दाखल करु नका? गावपुढाऱ्यांनी मुसळवाडी येथील एका हाँटेलवर बसुन घडलेल्या घटनेवर चर्चा करुन गुटखा व्यापारी व किराणा दुकानदार यांना सोडण्यासाठी त्या दोन पोलिसांबरोबर दोन लाखाची आर्थिक तडजोड करुन या दोन्ही व्यापाऱ्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल न करता सोडुन देण्यात आले.या घटनेचे प्रथमदर्शनींंनी माहिती दिली आहे. दोन्ही व्यापाऱ्यास पोलिसांनी गुटखा विक्री प्रकरणी मोठी तडजोड केली असुन परिसरातील ग्रामस्थांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
श्रीरामपूर येथील गुटखा प्रकरण ताजे असुन पोलिसांनी आरोपीस मदत केल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी तपास काढुन शिर्डीचे पोलिस उपअधिक्षक यांच्याकडे तपासाची सुञे सोपवली होती. पोलीस आर्थिक तडजोड करुन आम्ली पादार्थ विक्री करणाऱ्या आरोपीनां पाठीशी घालणार असतील तर शासनाने किती ही कठोर कायदे केले. तरी रक्षकच भक्षक झाले तर कायद्यापुढे कोणाचे चालणार आहे.कायदा फक्त सर्व समान्यांनसाठीच आसतो का? आसा सवाल ग्रामस्थ करत आहे. सध्या राहुरीत अशा अनेक प्रकरणांची चर्चा पुढे येत आहे.
तालुक्याच्या पुर्व भागात बनावट मद्याची सर्रस विक्री सुरु आसुन श्रीरामपूर तालुक्यातुन अनेक व्यापारी बनावट मद्य घेवुन हाँटेलवर पोहच करनारे तस्कर येतात दिवसा ढवळ्या लोकांना बनावट दारु विक्री केली जात आहे. कोण बनावट दारु विक्री करतो याची खडानाखडा माहिती पोलीसांना असुन सुद्धा कार्यवाही माञ केली जात नाही? पोलिसांकडून कारवाई का केली जात नाही? आसा सवाल ग्रामस्थांनी उपस्थीत केला आहे. अनेक ठिकाणी अवैध्यदारु विक्री सुरु असताना पोलीस मात्र बघ्यांची भुमिका घेतात याचे आश्चर्य व्यक्त होत आहे?
गुटखा विक्री प्रकरणी विना कागदपञाची झालेली कारवाई.दोन लाखाची आर्थिक तडजोडी अंती त्या दोन व्यापाऱ्यांना सोडून देण्यात आले. त्या दोन व्यापाऱ्यांना सोडुन देणारे ते दोन पोलिस कोण?याची चौकशी होवून व्यापाऱ्यासह त्या दोन पोलिसांविरोधात कारवाई करण्यासाठी येथील सामाजिक संघटना जिल्हा पोलिस अधिक्षक यांची भेट घेवून या घटनेचे लेखी निवेदन सादर करणार आहे.
...पोलिस निरीक्षक गाडेंचे कानावर हात...
माहेगाव ता.राहुरी येथील एका किराणा दुकानदाराच्या दुकानात श्रीरामपूर येथील गुटखा व्यापारी गुटखा देत असताना रंगेहाथ पकडला याबाबत गुन्हा दाखल बाबतची माहितीसाठी पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्यांकडे भ्रमणभाषवरुन माहिती घेतली असता. त्यांनी मला कोणती माहिती माहिती नाही. असे म्हणत चक्क कानावर हात ठेवले व या दोन लाखाच्या तडजोडी बद्दल काही चौकशी करू करतो किंवा माहिती घेतो एवढे बोलण्याची देखील तसदी गाडे यांनी घेतली नाही. याचा अर्थ पोलीस स्टेशन मध्ये आणखीनही काही घटना घडत असतील तर त्याला पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांचा छुपा पाठिंबा असतो काय असा प्रश्न ग्रामस्थांतुन उपस्थित होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत