राहूरी फॅक्टरी(वेबटीम) येथील बा.ब्र. वैरागी मुमुक्षु दर्शन नंदकुमार लोढा यांच्या जैन भगवती दिक्षानिमित्त रविवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२० ...
राहूरी फॅक्टरी(वेबटीम)
येथील बा.ब्र. वैरागी मुमुक्षु दर्शन नंदकुमार लोढा यांच्या जैन भगवती दिक्षानिमित्त रविवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२० रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
राहूरी फॅक्टरी येथील कांतीलाल लोढा(गादीवाले काका) यांचे नातू व नंदकुमार लोढा यांचे चिरंजीव दर्शन हे जैन भगवती दिक्षा घेणार असून त्यानिमित्त रविवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम आदिनाथ वसाहत,राहूरी फॅक्टरी येथे आयोजित केला आहे.
तरी राहूरी फॅक्टरी परिसरातील नागरिक, भाविक, हितचिंतक व मित्र परिवाराने उपस्थित रहावे असे आवाहन कांतीलाल लोढा(गादीवाले काका), नंदकुमार लोढा, वर्धमान लोंढा, वृषभ लोढा व लोढा परिवाराने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत