राहुरी(वेबटीम) राहुरी फँक्टरी येथे दोन दिवसापुर्वी राहुरी फँक्टरी व देवळाली प्रवरा भागातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी रास्तारोको आंदोलन कर...
राहुरी(वेबटीम)
राहुरी फँक्टरी येथे दोन दिवसापुर्वी राहुरी फँक्टरी व देवळाली प्रवरा भागातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आश्वासन दिले.परंतू दुसऱ्याच दिवशी राहुरी कारखाना येथील हाँटेल चालकास बेदम मारहान करण्यात आली. या प्रकरणी राहूरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राहूरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागातील रहिवासी शरद शंकर शेवंते(वय-५५) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, डी पॉल इंग्लिश मिडीयम स्कुल नजीक बालाजी चायनिज नावाने हॉटेल असून १२ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजता मी हॉटेल वरून घरी आराम करण्यासाठी गेलो असता माझा मुलगा राकेश याचा फोन आला असता त्याने सांगितले की, आपल्या हॉटेलसमोर प्रशांत राजू शिंदे व सागर कांतीलाल उल्हारे यांचे वाद चालू असून त्यांना मी माझ्या हाँटेल समोर भांडणे करुन नका, ती सोडवण्यासाठी गेलो असता मला दोघांनी मारहाण केली असून तुम्ही लवकर हॉटेलवर या. त्यावेळी मी हॉटेलवर तातडीने पोहचून वाद घालू नका शांतपणे घरी जा असे म्हणताच त्याचा राग धरून मला सागर उल्हारे याने धक्काबुक्की करून हातात दगड घेऊन मारला. त्यात माझे कपाळावर उजव्या बाजूस तसेच उजव्या बोटांना गंभीर जखमी केले.
राहुरी पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून प्रशांत राजू शिंदे व सागर कांतीलाल उल्हारे(दोघे.रा- राहूरी फॅक्टरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत