राजकीय कारणामुळे कोपरगावाला ४ वर्षे निधी मिळून दिला नाही.. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राजकीय कारणामुळे कोपरगावाला ४ वर्षे निधी मिळून दिला नाही..

  कोपरगाव प्रतिनिधी  अहमदनगर येथील नियोजन भवनात नगरविकास मंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपरिष...

 कोपरगाव प्रतिनिधी

 अहमदनगर येथील नियोजन भवनात नगरविकास मंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपरिषदेच्या विकास कामांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

             यावेळी बोलतांना कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सांगितले कि, गेली चार वर्षे जाणीवपूर्वक राजकिय कारणाने कोपरगाव नगरपरिषदेला विकास निधी मिळू दिलेला नाही. निदान यावर्षी तरी कोपरगावसाठी भरीव विकास निधी मिळावा. यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचेशी चर्चा करून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ४ कोटी रुपये देण्याचे तत्त्वतः मान्य केले.

          त्याचबरोबर गोदावरी नदी संवर्धन- घाट सुशोभीकरण व शुकलेश्वर-कचेश्वर देवस्थानसाठी तीर्थक्षेत्र पर्यटन इ.साठी विकास निधी मिळावा अशीही आग्रही मागणी केली. यावेळी आमदार आशुतोषजी काळे यांनी ५ नंबर साठवण तलाव व शहरातील रस्त्यांसाठी तसेच शहराच्या वाढीव भागाच्या विकासासाठी निधीची मागणी केली. या आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, कोपरगांव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, महापौर वाकळे व जिल्ह्यातील बहुसंख्य नगराध्यक्ष उपस्थित होते. ना.एकनाथजी शिंदे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील अनेक कामे मार्गी लागणार असल्याने सर्वांनीच या आढावा बैठकीचे स्वागत केले. अशी माहिती   नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत