देवळाली प्रवरात मृत कावळे आढल्याने खळबळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात मृत कावळे आढल्याने खळबळ

  देवळाली प्रवरा(वेबटीम)     देवळाली प्रवरा येथील भांड वस्ती येथे शनिवारी सकाळी मृत अवस्थेत तीन कावळे सापल्याने खळबळ उडाली असून पशुवैद्यकीय ...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)

    देवळाली प्रवरा येथील भांड वस्ती येथे शनिवारी सकाळी मृत अवस्थेत तीन कावळे सापल्याने खळबळ उडाली असून पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन करुन कावळ्याच्या घशातील स्ञाव प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला आहे.सोमवारी अहवाल आल्यानंतर कावळ्याचा मृत्यू बर्डफ्लूने झाला की अन्य कारणामुळे झाला हे समजणार आहे.

           याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळाली प्रवरा येथील सोपान भांड यांच्या वस्तीवर शनिवारी सकाळी १० वाजता तीन कावळे मृत अवस्थेत आढळले.तीन कावळ्यापैकी दोन कावळ्यांवर कुञ्यांनी ताव मारला. मृत अवस्थेतील कावळ्याचे भांड वस्ती येथील काही जणांनी राखन करुन नगर पालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत व उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांना मृत अवस्थेत कावळे सापडल्याची माहिती दिली.मुख्याधिकारी निकत व उपनगराध्यक्ष संसारे यांनी पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधुन घटनेची माहिती दिली.

                पशुवैद्यकीय अधिकारी डाँ.अमर प्रसाद माने यांनी आपल्या पथकासह देवळाली प्रवरा येथील भांड वस्ती येथे भेट देवून मृत अवस्थेतील कावळ्यांची पाहणी केली. डाँ.माने यांनी कावळ्याचे जागेवरच शवविच्छेदन करुन कावळ्याच्या घशातील स्ञाव तपासणीसाठी घेण्यात आला.कावळ्याच्या घशातील स्ञाव पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्याचा अहवाल सोमवार पर्यंत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच कावळ्याचा मृत्यू बर्डफ्लूने झाला की, अन्य कशाने झाला हे समजणार आहे. देवळाली प्रवरा भांड वस्ती येथे मृत अवस्थेत तीन कावळे सापडल्याने बर्डफ्लू आल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे नागरीकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रयोगाशाळेचा अहवाल आल्या नंतर खरी परीस्थिती समोर येणार आहे.त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन मुख्याधिकारी निकत व उपनगराध्यक्ष संसारे यांनी केले आहे. दरम्यान या वस्तीपासून नजिक पोल्ट्री फार्म असून पोल्ट्री फार्म मालक भीतीच्या सावटाखाली असून मृत कावळ्याच्या अहवालाकडे पोल्ट्री फार्म मालकाचे लक्ष लागले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत