शहरातील खोका शॉप संबंधी व्यापारी समितीने दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शहरातील खोका शॉप संबंधी व्यापारी समितीने दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन

कोपरगाव प्रतिनिधी  अतिक्रमणाच्या नावावर कोपरगाव  शहरातील काही वर्षा पूर्वी अनेक दुकाने काढण्यात आली त्यामुळे गेली दहा वर्षा पासून उध्वस्त झा...

कोपरगाव प्रतिनिधी 

अतिक्रमणाच्या नावावर कोपरगाव  शहरातील काही वर्षा पूर्वी अनेक दुकाने काढण्यात आली त्यामुळे गेली दहा वर्षा पासून उध्वस्त झालेले शहरातील दुकानदार आज ही  न्याय मिळेल या प्रतिक्षेत आहे. याच अनुषंगाने कोपरगाव व्यापारी समितीच्या वतीने शहरात ज्या ठिकाणी कोणताही अडथळा अथवा वाद विवाद नाही अशा  ठिकाणी खोका शॉप बांधून मिळावे  या आशयाचे निवेदन कोपरगाव नगरपालिकेला व  प्रशासनास अनेक वेळा देण्यात आले. 

त्यावर  वेळो वेळी बैठका घेतल्या आंदोलने करण्यात आली परंतु नगरपालिका फक्त वेळ काढू पणा करत आश्वासन देते,परंतु हा प्रश्न अद्यापही मार्गी लागत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांना संदर्भात कोपरगाव व्यापारी समितीने निवेदन दिले आहे की, आपणास कोपरगाव तहसील कार्यालय या ठिकाणी झालेल्या मीटिंग मध्ये निवेदन देऊन विस्थपित टपरी धारकांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात अाली होती मा जिल्हाधिकारी साहेब आपन कोपरगाँव नगरपालिका प्रशासनास जाब विचारत या विस्थपित टपरी धारकांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे आदेशही दिले होते.

तरीही सदरिल विषया बाबत कोपरगाव नगरपालिका कोणताही निर्णय घेत नाही,या संदर्भात आपन लक्ष्य घालून कोपरगाव येथील विस्थापित टपरी धारकाना न्याय द्यावा  असे निवेदन १२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले आहे.या निवेदनावर अकबर भाई शेख ,निसार शेख,शरद खरात संजय पोटे,अजय विघे रविंद्र जगताप इम्राम मनियार यांच्या सह्या आहेत.कोपरगाव व्यापारी समिती व सर्व पदाधिकारी जो पर्यत विस्थापित टपरी धारकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा चालूच ठेवु असा निश्चय केला आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत