पानेगाव(वेबटीम) नेवासा तालुक्यातील मुळाथडी परीसरातील पानेगाव तसेच पंचक्रोशीतील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असणारे महादेव देवस्थान अहम...
पानेगाव(वेबटीम)
नेवासा तालुक्यातील मुळाथडी परीसरातील पानेगाव तसेच पंचक्रोशीतील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असणारे महादेव देवस्थान अहमदनगर जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती यांच्या प्रयत्नातून क वर्गात समाविष्ट करण्यात आला यावेळी ग्रामस्थांसह महादेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने सोनई येथे सभापती गडाख यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा चे संचालक तथा लोकनियुक्त सरपंच संजय जंगले होते. यावेळी सत्कार उत्तर देताना गडाख यांनी सांगितले की, काम करणं ही प्रत्येक लोकप्रतिनिधीचे जबाबदारी असते गावच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता कधीच कमी पडून देणारं नसून आपण हि सर्वांनी विकासासाठी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची आव्हानही गडाख यांनी करून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच जंगले यांनी म्हटले की जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख झाल्यापासून मुळाथडी परिसरा बरोबरच पानेगावला नेहमीच झुकते माप मिळाले असून मोठ्या प्रमाणावरती गावचा विकास झाला तर उर्वरित विकासासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर ती गडाख यांनी निधी सुपूर्द केला असून आम्ही त्यांचे नेहमीच ऋणी असल्याचं जंगले यांनी म्हटले. महादेव देवस्थानचे सचिव किशोर जंगले यांनी म्हटले की सुरुवातीपासून सुनील भाऊ ट्रस्ट करण्यासाठी आग्रही भूमिका घेत होते. आज खऱ्याअर्थाने क वर्गात समाविष्ट झाल्याने निश्चितच आम्हांला आनंद होत असून निश्चितच मोठ्या प्रमाणावर देवस्थान तसेच परीसराचा विकास होण्यास मदत होईल.
जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पंगतीत वाढणारा आपला माणूस आसला तर निश्चितपणे पोट भरुन जेवायला मिळते असल्याचे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात नेहमी सांगत असतात. त्याच पध्दतीचे काम आज तालुक्यात जिल्ह्यात गडाख बंधूंचे सुरू असल्याचं नवगिरे यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी मुळा सहकारी साखर कारखान्याचे संचालक रंगनाथ जंगले, खरेदी विक्री संघाचे संचालक जालिंदर जंगले, महादेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामभाऊ जंगले, पानेगाव संस्थेचे उपाध्यक्ष अशोक गागरे, विठ्ठल गागरे, जगन्नाथ जंगले, हभप गुडधे महाराज, राजेंद्र जंगले, बबनराव जंगले, अनिल जंगले, जनार्दन गागरे, भारत जंगले, बाबासाहेब गुडधे, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले, भाऊसाहेब काकडे, रमेश गुडधे, बाळासाहेब जंगले, ताराचंद घोलप, सतिश जंगले, संजय वाघमारे,संजय पवार,तानाजी गायकवाड, डॉ काकडे,ज्ञानेश्वर जंगले, नामदेव गुडधे आदी मान्यवर उपस्थित होते.सुत्रसंचालन संदिप जंगले आभार तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय पाटील घोलप यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत