कोपरगाव(वेबटीम) महाराष्ट्र राज्याला साधू-संतांच्या परंपरेने समृद्ध केले आहे.साधू-संतांनाही त्यांचे हयातीत अनेक अडथळे आणले.फळे आलेल्या झाडांन...
कोपरगाव(वेबटीम)
महाराष्ट्र राज्याला साधू-संतांच्या परंपरेने समृद्ध केले आहे.साधू-संतांनाही त्यांचे हयातीत अनेक अडथळे आणले.फळे आलेल्या झाडांना दगड-धोंडे खात यातना सहन कराव्या लागतात.असे संतांनी सांगितले आहे.परंतु संतांनी अडथळ्यांना नडगमगता त्यांचे विचार आणि कृती समाजाला दिशा देण्यात तप्तर राहिली आहे.चिरंतन विचार कालांतरानेही समाज मनावर निरंतन टिकून राहतात.त्या मानाने आपण अतिशय जनसामान्य आहोत.चांगले काम करतांना अनेक अडथळे आणले जातील.ही भावना मनाशी ठेवून साधू-संतांचे विचार पुढे नेण्यासाठी त्यांचेतील सहनशीलता काही प्रमाणात अंगिकारली तर समाजाला पथदर्शी वाटेवर नेण्यात मोलाचा हातभार लागेल.अशी भावना सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी व्यक्त केली.
सूर्यतेज संस्थेच्या वतीने संत गाडगेबाबा जयंती निमित्त प्रतिमापूजन कोपरगाव नगरपरिषदचे सफाई मुकादम मनोज यादवभाई लोट यांचे शुभहस्ते करण्यात आले.कोपरगांव अमरधाम(जुने गावठाण) हे सफाई मुकादम मनोज लोट यांचेकडे असलेल्या विभागात स्वच्छतेची जबाबदारी आहे.सुरुवातीपासून कोविड बाधित मृतांवर अंतिम संस्कार करण्याची जबाबदारी या भागातील सफाई मुकादम मनोज लोट व त्यांचे सहकारी यांचे कडे आहे.कोविड काळात रात्री-अपरात्री मनोज लोट व त्यांचे सहकारी यांनी मृतांवर विधिवत अंत्यसंस्कार केले आहे.अनेक प्रसंगी मृतांचे नातेवाईक जवळ नसल्याने मृतांना अंतिम पाणी देण्याचे काम या समूहाने केले. त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी त्यांचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
याप्रसंगी उत्सव प्रेमी विशाल आढाव,सामाजिक कार्यकर्ते आनंद टिळेकर, पत्रकार अक्षय काळे उपस्थित होते. आपल्या कार्याची दखल घेत प्रथमच झालेल्या सन्मानाबद्दल श्रीयुत लोट यांचे डोळे पाणावले स्वच्छतादूत व आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके यांना आभार देत पुढे म्हणाले, आपल्यासारखे व आपल्या समवेत सदैव सोबत असणारे योध्दे होते म्हणून ही लढाई आपण पुढे नेऊ शकलो. असे सांगत आपण ज्या कोपरगावात लहानाचे मोठे झालो त्या गावात संकटकाळी सेवा करण्याची पिढ्यानपिढ्या मिळालेली संधी ही भाग्याची गोष्ट असल्याचे सांगितले.
नागरिकांनी यापुढील कालखंडात मास्क वापरावे. हात नियमित धुवावे.सामाजिक अंतर ठेवावे.असे आवाहन केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत