कोपरगाव(प्रतिनिधी) कोपरगाव शहराला नव्याने लाभलेले पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांची अल्पकालावधीतच बदली झाल्याने शहरात चर्चेला उधान आले आहे...
कोपरगाव(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराला नव्याने लाभलेले पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांची अल्पकालावधीतच बदली झाल्याने शहरात चर्चेला उधान आले आहे.आत्ताच नव्याने रुजू झालेले पो.नि.गवळी यांची अवघ्या दोन महिन्यातच त्यांची बदली शिर्डी साई बाबा मंदिर सुरक्षा या ठिकाणी झाली आहे.
पो.नि.राकेश माणगावकर यांची बदली कोतवाली पोलीस ठाणे येथे दि.११ नोहेंबर रोजी झाली होती.त्यानंतर कोपरगाव शहराला नवनियुक्त पोलीस निरीक्षक म्हणून हर्षवर्धन गवळी यांनी नियुक्ती करण्यात आली होती.अहमदनगर नियंत्रण कक्ष येथे कार्यरत असलेले पो.नि.श्री.हर्षवर्धन गवळी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे कार्यरत होते.आणि त्यानंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याची जबादारी त्यांनी २७ नोहेंबर रोजी अहमदनगर जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी आदेश काढल्या नंतर दि.२९ नोहेंबर रोजी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचा कारभार हाती घेतला होता.अवघ्या दोन महिन्यात त्यांची बदली झाली असून त्यांची नेमणूक शिर्डी साई बाबा मंदिर सुरक्षा या ठिकाणी झाली आहे.
शिर्डी साई बाबा मंदिर सुरक्षा येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या कडे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आलेल्या असल्याची माहिती अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख श्री.मनोज पाटील यांनी दि.२३ फेब्रुवारी रोजी आदेश जारी केला आहे.
पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे कोपरगाव शहरात करोनाच्या पार्शभूमीवर व शहरात चालणाऱ्या अवैध धंद्यावर कसे कामकरतात हे पाहणे आता कोपरगावकराणसाठी महत्वाच ठरणार आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत