देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालूक्यातील दरडगांव थडी येथील ( मायराणी ) मधील एका आदिवासी कुटुंबातील विजय पांडुरंग गांगड यांच्या राहत्या घराच...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालूक्यातील दरडगांव थडी येथील ( मायराणी ) मधील एका आदिवासी कुटुंबातील विजय पांडुरंग गांगड यांच्या राहत्या घराच्या छताला बुधवारी दुपारी आग लागली सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र जीवनावश्यक वस्तू व घर संसार उपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले आहे.
माहिती अशी की बुधवारी दुपारी विजय पांडुरंग गांगड हे नदीपात्रत मासे पकडण्यासाठी टाकलेले जाळे ओढण्यासाठी गेला होता .व पत्नी वैशाली गांगड आपले घरातील काम आवरून आपले व मुलांचे कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या यावेळेस त्यांची दोन मुले विष्णू (वय ३ )व कृष्णा ( वय ८ ) हे लहान मुले घरात झोपलेले होते .कपडे धूत असताना घराच्या छतामधून धूर निघत असल्याचे वैशालीच्या लक्षात आले तीने कपडे धून्याचे टाकू त्या ठिकाणावरून पळल काढला व पळत घराकडे आल्या व घरात झापलेल्या मुलाना स्वःता जीवाची परवा न करता मोठ्या धाडसाने आपल्या दोन्ही मुलांना बाहेर काढले तोपर्यंत आगीने संपूर्ण घराला वेढले होते. त्यानी धाड करून मुलाना बाहेर काढल्यामुळे दोन्ही मुलाचे प्रणा वाचले सुदैवाने कुठेली ही जीवितहानी झाली नाही ;पंरतू जीवन आवश्यक वस्तू मध्ये सात गोणी धान्य , तांदूळ , कपडे व संसार उपयोगी वस्तू भांडी ,सह सर्व साहित्याची राखरांगोळी झाली आहे .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत