केंदळच्या सरपंचपदी मंदाकिनी आढाव यांची निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

केंदळच्या सरपंचपदी मंदाकिनी आढाव यांची निवड

वळण(गोविंद फुणगे)          राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील केंदळ खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मंदाकिनी मच्छिद्र आढाव यांची बिनविरोध निव...

वळण(गोविंद फुणगे)

         राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील केंदळ खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मंदाकिनी मच्छिद्र आढाव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.आज दिनांक २५ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या सरपंच  निवडणुकीत निवडणूक निर्णायक अधिकारी भाऊसाहेब मेहेञे यांनी आढाव यांची निवड घोषीत केली आहे. त्यांस ग्रामसेवक पालवे,तलाठी राहुल क-हाड,दुर्योधन डोईफोडे यांनी सहाय्य केले.

  येथील तत्कालिन लोकानियुक्त सरपंच अनिता अनिल आढाव यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता त्यांनंतर येथील सरपंच पद रीक्त असल्याने नुतन सरपंच यांची निवड करण्यात आली आहे.आज सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात  सरपंच पदासाठी मंदाकिनी मच्छिंद्र आढाव आणि लता राजेंद्र मगर यांनी आपले उमेद्वारी अर्ज दाखल केले होते.त्यांनंतर लताबाई राजेंद्र मगर यांनी आपला उमेद्वारी अर्ज मागे घेतल्याने सरपंच पदासाठी मंदाकिनी आढाव यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी घोषीत केली.

प्रसंगी उपसरपंच बाळासाहेब आढाव,अनिता अनिल आढाव,राजेंद्र आढाव, सतिष आढाव,गोरक जाधव,संगिता बबन केदारी ,मनकर्णा नारायन सुर्यवंशी,वृक्षाली रविंद्र आढाव आदि ग्रामपंचायत सदस्यांसह लक्ष्मण आढाव,रामराव आढाव,मच्छिंद्र झिने,अनिल आढाव,बाबासाहेब भोईटे,तंटामुक्ती अध्यक्ष धोंडिराम आढाव,गणेश आढाव,अदीनाथ आढाव,गणेश गुंजाळ,अविनाश आढाव,पंढरीनाथ आढाव,शिवाजी आढाव,संदिप आढाव,विकास मगर,माणिक मगर,उद्धव आढाव,पंढरीनाथ आढाव,लक्ष्मण आढाव,ज्ञानेश्वर आढाव,बाळासाहेब आढाव,पोलिस पाटील प्रल्हाद तारडे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत