देवळाली प्रवरात साध्या पद्धतीने खंडोबा यात्रा उत्सव साजरा होणार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात साध्या पद्धतीने खंडोबा यात्रा उत्सव साजरा होणार

  देवळाली प्रवरा(वेबटीम) राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे श्री.खंडोबा महाराज यात्रा उत्सव कोरोना पार्श्वभूमीवर यंदा अतिशय साध्या पद्धत...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)

राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे श्री.खंडोबा महाराज यात्रा उत्सव कोरोना पार्श्वभूमीवर यंदा अतिशय साध्या पद्धतीने शनिवार दि.२७ ते रविवार २८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान आयोजित केली असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष अजित कदम यांनी दिली.

  देशात व राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शासकीय नियमांचे पालन करून विधिवत पूजन व विधी आदी कार्यक्रमांचे आयोजन करून अतिशय साध्या पद्धतीने यात्रा उत्सव साजरा करण्यात येणार असून शनिवार दि.२७  फेब्रुवारी रोजी पहाटे ३.३० ते ५.३० या वेळेत होमहवन, सकाळी ६ वाजता गंगापूजन व सकाळी ८ वाजता महाभिषेक आदी कार्यक्रम सोशल डिस्टनसिंग पाळून संपन्न होणार आहे. खेळण्या, रहाटपाळणे अन्य वस्तूंची दुकाने लावली जाणार नसून कोणीही या ठिकाणी दुकाने थाटू नये असे आवाहन अजित कदम यांनी केले आहे.

 दरम्यान दरवर्षी यात्रोत्सवाच्या वेळी नगर, नाशिक, औरंगाबाद, पुणे, बीड, जिल्ह्यातील अनेक लोककलावंत, बहुरूपी श्री खंडोबा देवाचे जागरण करणारे वाघ्या मुरळीची पथके हजेरी लावतात. संपूर्ण देवळाली प्रवरा शहरात प्रति जेजुरी अवतरते या यात्रेनिमित्त होणारा कुस्त्यांचा हंगामा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मल्हार केसरी मानाची गदा जिंकण्यासाठी मल्लामध्ये प्रचंड उत्सुकता असते. महाराष्ट्राची लोककला म्हणून मान्यता पावलेल्या लोकनाटयाचे फड न चुकता येतात आणि भंडारा घेऊन खेळ साजरा करतात परंतु यंदा कोरोनामुळे अतिशय साध्या पद्धतीने यात्रा उत्सव साजरा केला जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत