संचारबंदी सुरू असतानाही राहूरी फॅक्टरीत मध्यरात्री हॉटेल सुरू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संचारबंदी सुरू असतानाही राहूरी फॅक्टरीत मध्यरात्री हॉटेल सुरू

राहुरी फॅक्टरी(वेबटीम ) संचारबंदी सुरू असतानाही राहुरी फॅक्टरी येथे बुधवारी रात्री दहा नंतर हॉटेल सुरू असल्याने सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक हन...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)

संचारबंदी सुरू असतानाही राहुरी फॅक्टरी येथे बुधवारी रात्री दहा नंतर हॉटेल सुरू असल्याने सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी एन्ट्री करताच हॉटेल चालक व गिऱ्हाईक यांची एकच पळापळ सुरू झाली. यावेळी श्री. गाडे यांनी उशिरा हॉटेल सूरु ठेवणाऱ्या हॉटेल चालकांची चांगलीच कान उघडणी केली असून पुढील आदेश येइपर्यंत नगर मनमाड रस्त्यावरील कोणतीही आस्थापना रात्री दहा ते पहाटे पाच पर्यंत सुरू दिसल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रदर्भावामुळे जिल्ह्यात रात्री दहा ते पहाटे संचार बंदी लागू करणात आली आहे. तरीही  राहुरी फॅक्टरी येथील कारखाना पेट्रोल पंपसमोरील अनेक हॉटेल  रात्री १ वाजता सुरू होते. ही बाब गस्तीवर असलेल्या पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या लक्षात आली आणि त्यांनी तात्काळ हॉटेलकडे मोर्चा वळवला.त्यामुळे एकच पळापळ झाली. राहुरी कारखाना सुरू असल्याने हॉटेल वर ऊसतोडणी कामगार,वाहन चालक,परराज्यातील प्रवासी,त्याच बरोबर स्थानिकांची गर्दी असते. पोलीस  निरीक्षक गाडे यांनी हॉटेल चालकांना चांगलाच दम भरला व  संचारबंदी कालावधीत हॉटेल सुरू ठेवण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील असे सांगितले.

कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने राहुरी शहर व तालुक्यातील नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये.रात्री दहा ते पहाटे पाच पर्यंत संचारबंदी चे काटेकोरपणे पालन करावे, या दरम्यान कोणतीही आस्थापना सुरू असल्याचे आढळून आल्यास त्याच बरोबर विनाकारण फिरणाऱ्या व्यक्ती आढळून आल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत