देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथे कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.सोमवार दि.22 रोजी एका शेतकरी कुटुंबातील पाच जण कोरोना बाधि...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथे कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.सोमवार दि.22 रोजी एका शेतकरी कुटुंबातील पाच जण कोरोना बाधित आढळल्या नंतर बुधवारी दि.24 रोजी पुन्हा तीन व्यक्तींचा अहवाल कोरोना बाधित असल्याने एका आठवड्यात 12 व्यक्ती कोरोना बाधित आढळले असले प्रशासन माञ शांत बसलेले दिसत आहे. शहरातील नागरीकांनी धास्ती घेतली आहे. विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांनवर प्रशासन माञ कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळाली प्रवरा शहरात कोरानाने डोके वर काढले आहे.गेल्या आठवड्यात एका 27 वर्षीय तरुण व 52 वर्षीय व्यक्ती यांचा कोराना मुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर एका पाठोपाठ रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. रविवारी दि.21रोजी एक रुग्ण तर सोमवार दि.22 रोजी एका कुटुंबातील 4 व्यक्ती व पाहुण्या म्हणून आलेल्या एक महिला असे एकुण 5 जण कोराना बाधित आढळले.बुधवार दि.24 रोजी पुन्हा 3 रुग्णांची भर पडली आहे.आठवडा भरात सुमारे 12 व्यक्ती कोरोना बाधित झाल्या आहेत. अहवाल आरोग्य विभागास प्राप्त झाला आहे. रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.शनिवारी आठवडे बाजार असतो त्या दिवशी पालिका प्रशासन काय खबरदारी घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सध्या पालिका सध्या सुस्त आहे.
शहरात विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे कोरोना पासुन काळजी घेणाऱ्या नागरीकांनी नाराजी व्यक्त करीत आहे.प्रशासनाने विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत